गरजू व होतकरू ९०० विद्यार्थ्यांना संपूर्ण साहित्य वाटप

0
जळगाव– भवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई फाउंडेशन, अण्णासाहेब सागरमल सांखला पंतसंस्था तसेच राज्य अन्याय विरोधी जनजागृती यांच्या संयुक्त विद्यमाने गरजु व होतकरू ९०० विद्यार्थ्यांना संपूर्ण साहित्य वाटप करण्यात आले़ हा कार्यक्रम शनिवारी दुपारी २ वाजता कांताई सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला़ संपूर्ण सभागृह हा विद्यार्थ्यांसह पालकांनी फुल्ल झाला होता़ शालेय साहित्य मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहºयावर आनंद झळकताना पहायला मिळाले़.
व्यासपीठावर जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, दलूभाऊ जैन, सांखला अर्बनचे राजेंद्र साखला, अनिल सांखला, विलास जैन, दीपक सालेचा, माजी महापौर विष्णु भंगाळे, महेंद्र शहा, रजनीकांत शहा, कांतीलाल कोठारी, स्वरूप लुंकड आदी मान्यवर उपस्थित होते़ कार्यक्रमाची सुरूवात दिपप्रज्वलन करून करण्यात आली़ शहरातील विविध विद्यालयातील इयत्ता तीसरी, चौथी तसेच पाचवी, सहावी व सातवीचे गरजु, होतकरू विद्यार्थी-विद्यार्थीनी मोठ्या संख्येने पालकांसह सभागृहात उपस्थित होते़ यानंतर दलूभाऊ जैन यांनी अध्यक्षीय भाषण केले़ त्यात त्यांनी फुलांची महत्ती सांगत शिक्षणाचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून दिले़ जिल्हाधिकारी निंबाळकर यांनी देखील मनोगतात ईश्वराशी नातं जोडायचे असेल तर मुलांच्या पाठीवर शाब्बासकीचा थाप द्यावी असे त्यांनी सांगितले़ यानंतर उपस्थितांनी आप-आपले मनोगत व्यक्त केले़ .