दानवेंचा सेनेला ‘सत्ताव्यवहाराचा’ सल्ला!

0

मुंबई : भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी पुन्हा शिवसेनेला खिजवले आहे. मुंबईसह राज्यातील 6 महापालिकांमध्ये भाजपची सत्ता येईल. त्यामुळे आम्हाला कोणाच्याही मदतीची गरज पडणार नाही. मुंबईत कदाचित थोडाफार फडक पडू शकतो. तशी वेळ आल्यास शिवसेनेनेच भाजपला युतीचा प्रस्ताव द्यायला हवा, असे दानवे यांनी सांगितले. त्यांनी बुधवारी एका वृत्तवाहिनीशी बोलताना ही माहिती दिली. युती ही शिवसेनेने तोडली आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेत त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाल्यास टाळीसाठी शिवसेनेनेच हात पुढे करावा, असे दानवेंनी म्हटले आहे.

इतर ठिकाणी भाजपच किंगमेकरची भूमिका बजावेल

दानवेंच्या या विधानामुळे आता कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेप्रमाणे शिवसेना-भाजप यांची निवडणुकीनंतर युती होण्याचे संकेत मिळत आहेत. शिवसेना-भाजपमध्ये वैचारिक मतभेद नाहीत, असेही दानवे यांनी या वेळी स्पष्ट केले. मुंबईसह सहाही महानगरपालिकांमध्ये भाजपचाच महापौर बसेल. याठिकाणी आम्हाला कुणाच्याही आधाराची गरज लागणार नाही. उर्वरित महानगरपालिकांमध्ये, असे दानवेंनी सांगितले.

वाढलेला टक्का हा भाजपसाठी फायदेशीर

मतदानाचा वाढलेला टक्का हा भाजपसाठी फायदेशीर ठरेल, असा विश्‍वास रावसाहेब दानवेंनी व्यक्त केला आहे. मुंबईत सन 2012 मध्ये झालेल्या महानगरपालिकेत जेमतेम 45 टक्के मतदान झाले असताना मंगळवारच्या मतदानात ही टक्केवारी तब्बल 10 टक्क्यांनी वधारून 55 टक्क्यांवर गेल्याचे दिसत असले तरी या वेळी मुंबईतील तब्बल 10 लाख मतदार कमी झाल्याने ही वाढ म्हणजे सगळ्याच राजकीय पक्षांसाठी, विशेषतः भारतीय जनता पक्ष व शिवसेना यांच्यासाठी एक चकवा ठरण्याची शक्यता आहे.