गरज संपली की विसरणारा पक्ष भाजप: अजित पवार

0

पुणे: राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. प्रचाराचा जोर वाढला आहे. राजकीय आरोप-प्रत्यारोप होत आहे. दरम्यान आज राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील हडपसर येथे चेतन तुपे यांच्या प्रचारार्थ सभा घेतली, यावेळी त्यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली. भाजप फक्त जनतेचा मतासाठी वापर करून घेत आहे, पाच वर्षापूर्वी भाजपने जनतेचा वापर मतासाठी करून घेतले. मात्र पाच वर्षात काहीही केले नाही. आताही जनतेसमोर जाऊन मत मागत आहे.

भाजप हा केवळ गरजेसाठी वापर करणारा पक्ष आहे हे पुन्हा सिद्ध झाले आहे. पक्षातील ज्येष्ठ नेते, ज्यांनी भाजपला मोठे केले अशा नेत्यांना देखील भाजपने संपविले. माजी मंत्री एकनाथराव खडसे, विनोद तावडे, प्रकाश मेहता, चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी दिली नाही. यातूनच भाजप गरजेपुरता वापर करणारा पक्ष असल्याचे आरोप अजित पवारांनी केले.