गरम अन्न व पेय दातांसाठी हानिकारक

0

सेरेम्बान | तुमचा टुथब्रश दोन महिन्यांपेक्षा जास्त चालवत असाल तर आता नवा घ्यायची वेळ आलेली आहे. ब्रशचे दातच खराब झाल्याचे ते निदर्शक आहे आणि त्यामुळे तुमच्या तोंडाचे आरोग्य बिघडण्यास सुरूवातही झालेली आहे. दातांमध्ये सणक आणि जबड्याला व हिरड्यांना त्रास हे पावसाळ्यात नक्की होणारे रोग आहेत. त्यामुळे ते टाळण्यासाठी वाफाळणारे अन्न आणि पेय घेणे हा चांगला उपाय आहे. कोलंबिया एशिया हॉस्पिटलमधील दंतवैद्यक शास्त्र सल्लागार रोमशा विशिष्ठ यांनी काही टीप्स दिल्या आहेत.

दातांमधील सणक टाळण्यासाठी
पावसाळ्यात दातामधील सणक घालवणाऱ्या टुथपेस्टने दोनदा दात घासा
कृत्रिम साखर असलेले पदार्थ टाळा
जुने ब्रश टाकून नवे वापरा
सुप प्या, बदाम, मका, स्ट्रॉबेरी खा
काकडी, अननस, सी व्हीटामिनयुक्त अन्न खा
नारळाचे पाणी, फळांचा रस आणि पाणी प्या
जीभ स्वच्छ करा
गरम सुप, चहा, तळलेले गरम अन्न टाळा