गरिबीला प्रगतीमधील बाधा मानू नका : मर्चंट

0

पुणे । गरिबीला प्रगतीमधील बाधा मानू नका, योग्य अभ्यास आणि प्रयत्नातून आपण नक्कीच यशस्वी होऊ शकतो हा माझा अनुभव आहे, असे मत ग्यान आदबचे संस्थापक फारुक मर्चंट यांनी व्यक्त केले. ग्यान आदब सेंटरच्यावतीने आयोजित केलेल्या ‘ग्यानरुची सेवा सन्मान’ सोहळ्यात वस्ती पातळीवर काम करणार्‍या महिला कार्यकर्त्यांना सेवा सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

संस्थेचे संस्थापक नसीमा मर्चंट, सतीश खोत, गुलशन, मुमताज पीरभाय, नादीया सेनशर्मा, दिलीप बोकील यावेळी उपस्थित होते.

नसीमा मर्चंट म्हणाल्या, वस्ती पातळीवरील महिलांना ज्ञानाचे दरवाजे खुले करून देण्याचा पहिला टप्पा म्हणून आम्ही वाचनालये सुरू केली. आता आरोग्य, योग शिबिरे, महिला सक्षमीकरणाचे कार्य वस्तीपातळीवर सुरू आहे. यामध्ये काम करण्यासाठी महिला स्वतःहून पुढे येत आहेत. एकमेकांच्या सहकार्याने प्रगती करत आहेत ही समाधानाची बाब आहे.

निर्मला कांबळे, अरुणा ओव्हाळ, सुप्रिया साळुंके, शाहीन मुलानी, माया कांबळे, उषा शेंडकर, सुजाता कुडले, अनिता चव्हाण, सुषमा पाटील, आरती ओव्हाळ, पायल भुजबळ, राणी परदेशी, निलीमा भोसले, अनुष्का मुरमुरे, ललिता तिकोणे, शोभा गायकवाड आदींना यावेळी सन्मानित करण्यात आले. हडपसर, कोथरूड, शिवाजीनगर, येरवडा, ताडीवाला रोड परिसरात महिलांसाठी ग्रंथालय चालविले जाते. शैलजा बोकील यांनी आभार मानले.