गरीब जनतेची माफी मागतो, पण गरज समजून घ्या; मोदींची ‘मन की बात’

0

नवी दिल्ली: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीदेशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बातद्वारे देशवासियांशी संबोधित करत आहे. यावेळी लॉकडाऊन सारखा कठोर निर्णय घेतल्याने गरिबांवर वाईट वेळ आली आहे, त्यामुळे मी त्यांची प्रथमतः माफी मागतो, परंतु आजची परिस्थिती बघता हा कठोर निर्णय घेण्याची आवश्यकता होती असे मोदींनी सांगितलं. लॉकडाऊन सारखा निर्णय घेतल्यामुळे तुमच्या मनात माझ्याबद्दल राग आहे परंतु तुमच्यासाठी हा निर्णय घेतल्याचेही मोदींनी सांगितले. यावेळी मोदींनी देशातील काही लोकांशी फोनद्वारे संवाद साधत, सल्ला, अनुभव जाणून घेतला.

नियम मोडणारे स्वतः च्या आयुष्याशी खेळत आहेत, थोडे दिवस आहेत, यावर विजय नक्की मिळवू, फक्त संयम राखा असे आवाहनही मोदींनी केले.

या परिस्थितीत सहकार्याचीअपेक्षा असून स्वतःची आणि कुटुंबियांची काळजी घ्या असे आवाहन ही मोदींनी केले.