शहादा। शहरातील गरीब नवाज कॉलनी परिसरातील जनजीवन आज पुर्व पदावर आले असुन त्या भागातील पोलीस बंदोबस्त काढण्यात आला आहे. नगरपालीका बांधकाम सभापती सद्दाम तेली यांच्या खुनानंतर गेल्या तीन दिवसापासुन गरीब नवाज कॉलनीत दुकानांची, घरांची तोडफोड जाळपोळ करण्यात आली होती. सातत्याने तीन दिवस दहशतीचे वातावरण होते.त्या भागात कोणतेही लोकप्रतिनिधी अथवा राजकीय कार्यकर्ते फिरकले नव्हते. सद्दाम तेली यांच्या दफनविधी झाल्यानंतर गटागटाने फिरणारे तरुणांची संख्या कमी झाली.
व्यावसायिकांचे व्यवसाय सुरु
सर्व व्यवहार सुरळीतपणे सुरु झाले आहेत .गरीबनवाज कालनीत फेरफटका मारला असता खेतीया रस्त्यावरील मोटार दूरस्थी दुकानेसह सर्व दुकाने सकाळ पासून सुरू झाले. त्यात विशेष म्हणजे त्या भागात टरबुज विक्रेत्यांनी ही दुकाने थाटली आहेत. मुस्लीम महिला दुकानमध्ये खरेदी करताना दिसत होते. जवळ जवळ सर्वच व्यावसायीकानी आपआपले व्यवसाय सुरु केले आहेत . त्यात सर्वाधिक संख्या गॅरेजवाल्यांची आहे. कॉलनीपरीसरातील दवाखानेही सुरु होते ,जे गेल्या तीन दिवसापासून बंद होते. पेट्रोलपंप ही सुरळीत सुरु झाले आहेत.
फरार आरोपींसाठी शोध मोहीम
खुन प्रकरणातील फरार आरोपीना पकडण्यासाठी पोलीसांनी पथके पाठवून शोध मोहीमा सुरु केल्या आहेत. तर जाळपोळ दगडफेक तोडफोड करणार्या आरोपिंच्या विरोधात पोलीसांनी कार्यवाही सुरु केली आहे. पोलीसंची गस्त सुरु ठेवली आहे. पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत पोलीस कर्मचार्यांसोबत गस्त करीत आहेत. रमजान महिना सुरु असल्याने खबरदारी म्हणून शहरातील चार रस्ता, जामामशिद चौक , बागवान गल्ली भागात पोलीस बंदोबस्त कायम आहे. तसेच पाच जखमींवर शहरातील डॉ. बी. डी. पाटिल यांच्या रुग्णालयात उपचार सुरु होते,पाचही जखमीच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे सांगण्यात आले.
मुख्य आरोपींसह 300 जणांवर गुन्हे
नगरसेवक सद्दाम तेली हत्येनंतर शहरात उसळलेल्या दंगलीत तीन स्वतंत्र गुन्हे दाखल झाले असून पोउनि ज्ञानेश्वर बडगुजर यांच्या फिर्यादीवरुन संशयित व त्यांच्या नातेवाईकांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न, जाळपोळ, लूटमार, पोलिसांवर हल्ला चढवून शासकीय वाहनांवर पेट्रोल फेकने, पोलिस अधिकार्यांना जायबंदी करुण जीवे ठार मरण्याच्या प्रयत्न करने आदि कलमान्वये 42 मुख़्य आरोपींसह 300 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. दरम्यान पोलिसांनी मुख्य आरोपीस सुरत येथे सापळा रचून अटक केली आहे. तसेच मोईन सलिम बेलदार, शे.आसिफ शे. हुसेन, मोहसिन शेख मेहतर, रहीम गनी बेलदार, सलीम मुश्ताक खाटिक या पाच आरोपींनाही अटक केली आहे.
पाल्यांना सोडण्यासाठी पालकांची गर्दी
गरीब नवाज परीसराजवळील खेतीया रस्त्याला लागुन असलेली मिशन शाळा ही वेळेवर सुरु झाली. मात्र गेल्या दोन दिवसाचे वातावरण बघता आपाआपल्या पाल्याना सोडण्यासाठी पालकांनी गर्दी केली होती.तर काही पालक सकाळसत्राची शाळा सुटेपर्यंत थांबले होते. घटनेचे पडसाद बघता विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवर परीणाम झाला होता. तर ग्रामीण भागातील विद्यार्थी उपस्थिती नगण्य होती.