गरुड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

0

शेंदुर्णी । येथील गरूड महाविद्यालयात शुक्रवारी 1 रोजी युनिक अ‍ॅकॅडमीतर्फे स्पर्धा परीक्षा कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळेचे मुख्यत्वे भारतीय राज्यघटना या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. युनिक अकॅडमीचे प्रमुख मार्गदर्शक प्रा.सुनिल देशमुख यांनी कार्यशाळेत भारतीय राज्य घटना अध्ययनातील गुह्यस्थळे अधोरेखीत केली.

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी लोकसभा व राज्यसभागृहात पक्षाकडे 2/3 बहुमत असल्याने मुस्लीम लॉ अ‍ॅक्ट कसे पारित केले याच्या परीणामांचा अभ्यास करण्यापेक्षा विधेयक, कायदा, घटना दुरुस्ती, नियम, मार्गदर्शक तत्वे कशी अभ्यासावीत याविषयी त्यांनी विदयार्थ्यांना मार्गदर्शन केले. नूतन मराठा महाविद्यालयाचे माजी प्रा.सुनिल गरुड यांनी भारतीय राज्य घटने संदर्भात मार्गदर्शन केले.

राज्यघटनेविषयी मार्गदर्शन
प्राचार्य डॉ.वासुदेव आर पाटील यांनी प.पु.भय्युजी महाराज स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रामार्फत आयोजित कार्यशाळेच्या आयोजकांचे अध्यक्षीय भाषणातून कौतुक केले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे समन्वयक प्रा.दिनेश यांनी ग्रामीण भागातील नवयुवकांपुढे स्पर्धा परीक्षेला समोरे जाण्याशिवाय अन्य पर्याय नसल्याचे आपल्या प्रास्ताविकातून स्पष्ट केले. याप्रसंगी उपप्राचार्य एन.एस.सावळे, प्रा.भूषण पाटील यांनी देखील मार्गदर्शन केले.

विद्यार्थ्यांने व्यक्त केले मनोगत
प्रशांत धनगर, सपना कोळी या विद्यार्थ्यळनी मनोगते व्यक्त केली. या प्रसंगी प्रा.अमर जावळे, डॉ.संजय भोळे, डॉ.प्रशांत देशमुख, डॉ.आर.डी.गवारे, प्रा.महेश पाटील, प्रा.व्ही.एन.पतंगे, प्रा.संदिप कुंभार, प्रा.वर्षा लोखंडे, प्रा.लीना पाटील, प्रा.दिपक शिरसाठ, प्रा.छाया पाटील, प्रा.संदीप द्राक्षे, प्रा.अप्पा महाजन, प्रा.पी.जे.सोनवणे, प्रा.ए.एन जिवरग उपस्थित होते. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी नवाल पाटील, दिनेश वानखेडे, दत्तू गवाळे, दिपक अजलसोंडे, गोपाल चौधरी, सतीष पाटील, राजेंद्र संदानशिव, बशरत तडवी आदींनी परिश्रम घेतले. सुत्रसंचालन मनीषा शिंपी याने तर आभार शाम पाटील यांनी मानले.