गरुड महाविद्यालयातील खेळाडूंची कबड्डी स्पर्धेत निवड

0

शेंदुर्णी । येथील गरुड कला व वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे खेळाडू तृतीय वर्ष कलाची आरती रमेश शिंदे (रा.लोहारा) हीची निवड कब्बडी संघात उत्तर महाराष्ट्र विद्यापीठस्तरीय स्पर्धेत झाली. या स्पर्धा 30 जानेवारी ते 5 फेबु्रवारी या कालावधीमध्ये एच.ए.नॉर्थ गुजरात विद्यापीठ, पाटण (गुजरात) येथे होणार आहे. या खेळाडूंचे अभिनंदन संस्थेचे चेअरमन संजयरावजी गरुड व माजी जि.प.सदस्य सागर जैन, संस्थेचे सचिव दीपक गरुड, माजी पं.स.सदस्य सुधाकर बारी, नबीशहा, विठ्ठल फासे व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.वासुदेव आर.पाटील व शिक्षक व शिक्षकोत्तर कर्मचारी वर्ग यांनी केेले. या खेळाडूंना प्रा.महेश आर.पाटील व प्रा.आर.जी.पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.