शेंदुर्णी । उमवितर्फे शैक्षणिक, प्रशासकीय कामकाजाविषयी माहिती, सुविधा, प्रतवारी व विविध उपाययोजना व त्यांची उपयोगिता आणि राबविण्यात आलेले विविध उपक्रमावर आधारीत उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कारात येथील गरूड महाविद्यालयाला विद्यालयाला उत्तेजनार्थ पुरस्काराने गौरविण्यात आले. या पुरस्काराबाबत संस्थाध्यक्ष संजय गरुड, सचिव सागरमल जैन, सहसचिव दिपक गरुड आणि संचालक यांनी प्राचार्य डॉ. व्ही.आर.पाटील, उपप्राचार्य प्रा.एन.एस.सावळे, प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी यांचे अभिनंदन केले असुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.