प्र.कुलगुरू डॉ.पी.पी.माहुलीकर यांच्याहस्ते कार्यशाळेचे उद्घाटन
शेंदुर्णी – येथील गरूड महाविद्यालयात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि राज्यशास्त्र व लोकप्रशासन परीषद आयोजित एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेचे उद्घाटक म्हणून प्र.कुलगुरू डॉ.पी.पी.माहुलीकर उपस्थित होते. मूलभूत शिक्षणा सोबत ग्रामीण भागात रोजगाराभिमुख अभ्यासक्रम राबविणारे प्रयत्नशिल, उपक्रमशिल महाविदयालय म्हणून त्यांनी महाविदयालयाचा गौरव केला. ग्रामीण भागतील आपले विद्यापीठ जागतिक पातळीवरील बदल ओळखून वाटचाल करीत आहे.
नवीन अॅक्ट नुसार चॉईस बेस क्रेडीट सीस्टम (सीबीसीएस) अभ्यासक्रमीक विकासासाठी गरजेचे असल्याचे उद्धाटकीय भाषणातून स्पष्ट केले. सीबीसीएस राबवित असतांना पारंपरिक अभ्यासक्रमांचे तसेच विद्यार्थीसंख्या व प्राध्यापकांचा कार्यभार यावर विपरीत परीणाम होणार नाही याचा विचार करीत महोदय कुलगुरू आणि तज्ञांनी यथायोग्य अंमलबजावणी जेणे करुन कुठलाही गोधळ न होता. आज सर्व संलग्न महाविद्यालयांचे अॅकॅडमिक कॅलेंडर नव्या आयुधांनी सज्ज आहे.
राज्य शास्त्र व लोक प्रशासन अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ.दिलीपसिंह निकुंभ यांनी सीबीसीएस व राज्य शास्त्र विषयात रोजगाराच्या संधी यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव सागर मलजी जैन हे होते. प्राचार्य डॉ. प्रमोद पवार यांनी कार्यशाळेतील एकंदरीत चर्चेचा आढावा आपल्या भाषणातून घेतला. महाविदयालयाचे प्राचार्य डॉ.वासुदेव पाटील आणि डॉ. शाम साळुंखे यांनी विद्यापीठाने शैक्षणिक अंकेक्षण करीताना महाविद्यालयाची समाजा भिमुखता, आविष्कार संशोधनातील नैपुण्य, महाविद्यालय स्तरावरील प्रमाणपत्र अभ्यासक्रम या मुद्यांचा समावेश सारणीत असावा, या आशयाचे निवेदन प्र कुलगुरू डॉ पी.पी.माहुलीकर यांना दिले.