गरूड महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

0

शेंदूर्णी । अ.र.भा.गरुड कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाचे वार्षिक स्नेह संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी कुलगुरु डॉ.के.बी.पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. वर्गकक्ष येणाच्या काळात डिजीटलाईज्ड करण्यात येतील, अशी घोषणा कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून प्रा.डॉ.वासुदेव पाटील यांनी केेले. माजी कुलगुरु प्रा.डॉ.के.बी.पाटील यांचा सत्कार शेंदूर्णी एज्यु.सोसायटीच्यावतीने करण्यात आला. तसेच सेवानिवृत्ती माजी प्रा.डॉ.के.व्ही.पाटील यांचा सपत्निक तसेच प्रा.एन.जी.संघवी यांचा देखील सत्कार करण्यात आला. महाविद्यालयाची विद्यार्थींनी उमवि कुस्तीपट्टू आरती शिंदे हीला खाशाबा जाधव पुरस्कार देवून गौरविण्यात आले. तसेच सरला गरुड, प्रा.एन.एस.सावळे, प्रा.अप्पा महाजन, प्रा.एन.बी.वानखेडे यांना सन्मानित करण्यात आले, तर स्टुडंट ऑफ द इयर शुभांगी फासे ठरली.

यांची होती उपस्थिती
प्राचार्य प्रा.डॉ.आर.टी.चौधरी, दिलीप पाटील, प्रा.सुनिल गरुड, सागरमल जैन, प्रा.शाम साळुंखे यांनी मनोगत व्यक्त केले. माजी कुलगुरु प्रा.एन.के.ठाकरे यांनी खानदेशात ज्ञानपंढरी उमविचा पाया रचला तर माजी कुलगुरु प्राचार्य के.बी.पाटील यांनी कळस चढविला तर विद्यमान कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील यांच्या काळात संशोधकन विद्यार्थी निश्‍चितच देशाटन करतील, अशा भावना अध्यक्षीय समारोपातून विद्यमान जि.प.सदस्य दादासो संजय गरुड यांनी व्यक्त केल्या. तसेच से.नि.प्रा.डॉ.के.व्ही.पाटील व प्रा.एन.जी.संघवी यांच्या दिर्घकालीन सेवेबाबत संस्थेच्यावतीने ऋणभावना व्यक्त केल्या. सुत्रसंचालन प्रा.ए.एल.जिवरठा तर परिश्रम प्रा.दिनेश पाटील व आभार सागरमल जैन यांनी मानले. प्रा.अनिल पाटील (जिल्हाध्यक्ष उमवि), विलास अहिरे, विठ्ठल फासे, अविनाश निकम, प्रसन्ना फासे, रवी गुजर उपस्थित होते.