शेंदुर्णी । येथील गरूड माध्यमिक विद्यालयातील आदर्श वर्ग व आदर्श विद्यार्थी निवड कार्यक्रम नुकताच पार पडला. दरवर्षी विद्यालयात हा कार्यक्रम साजरा करण्यात येत असून यामध्ये विद्यार्थ्यांना पूर्ण केलेले कामकाज त्यांची वागणूक व आदर्श होण्यासाठी लागणारे निकष यामध्ये पूर्ण करावे लागतात. 5 वी ते 7 वी विभाग, 8 वी ते 10 वी विभाग या दोन्ही विभागातून आदर्श वर्ग आदर्श विद्याथ्यार्थी यांची निवड केली जाते. गेल्या वर्षभरात गरूड माध्यमिक विद्यालयात अनेक उपक्रम राबवित असून यात उत्कृष्ट विद्यार्थी ज्याने शाळेचे सर्व नियम काटेकोर पणे पाळले आहे. तर उत्कृष्ट वर्ग म्हणजे ज्या वर्गाने वर्षाभरात राबवित असलेल्या सर्व उपक्रमांमध्ये उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदवला यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले होते.
आदर्श विद्यार्थ्यांची निवड करून पुरस्कार वितरण
यामध्ये दिवाळी गृहपाठमध्ये प्रथम स्मिता इनामदार, द्वितीय आकांक्षा बारी, तृतीय प्रतिभा रोकडे यांना मिळाले. तर मराठी विभागातून नंदा बारी, सुरेश नाईक, कल्याणी कोष्टी, खुशी काबरा, कल्याणी चौधरी, प्रविण राठोड, स्नेहल पवार, स्नेहा चौधरी, जितेंद्र पवार आदि विद्यार्थ्यांना उत्कृष्ट दिवाळी गृहपाठासाठी बक्षिस देण्यात आले. विद्यालयात घेण्यात आलेल्या क्रिकेट सामन्यात प्रथम विजेता संघ 8 वी (फ)द ग्रेट मराठा संघ व द्वितीय द ग्रेट बंजारा संघ, 8 वी (ड) यांना बक्षिस वितरण करण्यात आले. आदर्श विद्यार्थी निवडमध्ये 7 वी विभागातून प्रणाली रगडे, अथर्व मेश्राम, जागृती शिंदे, संतोष राठोड, स्नेहल बारी, मनोज राठोड 9 वी ते 10 वी विभागातून अरविंद नाईक, कल्याणी चौधरी, नरेंद्र भोई, रूचिता बारी, सौरभ दांडगे, वैशाली गुजर आदी विद्यार्थ्यांची निवड आदर्श म्हणून करण्यात आली. आदर्श वर्ग निवड कार्यक्रमात आदर्श वर्ग म्हणून 5 वी ते 7 वी विभागातून 6 वी (फ)ची आदर्श वर्ग म्हणून निवड करण्यात आली.
यांची होती उपस्थिती
प्रास्ताविक उपशिक्षक टी.जी. पाटील यांनी केले. त्यानंतर मान्यवरांचा सत्कार समारंभ पार पाडण्यात आला. बक्षिस वितरण कार्यक्रम साजरा करण्यात आला. कार्यक्रमासाठी आलेल्या प्रमुख पाहुण्यांमध्ये पत्रकार देवेंद्र पारळकर यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषण पं.स. सदस्य डॉ. किरण बारी यांनी केले. कार्यक्रमासाठी अनेक मान्यवरांची उपस्थिती मिळाली. पं.स.सदस्य डॉ. किरण बारी, सुधाकर बारी, शांताराम गुजर, मुख्याध्यापक बी.जी. मांडवडे, उपमुख्याध्यापक एस.डी.चव्हाण, पर्यवेक्षक एस.एस.जैन. डी.आर.शिंपी, पत्रकार, पालक, शिक्षक, विद्यार्थी यांची उपस्थिती लाभली.