यावल तालुक्यातील सावखेडा येथील घटना ः सासरच्यांनी पेटवून दिल्याचा विवाहितेच्या नातेवाईकांचा आरोप ६५ टक्के जळाल्याने गंभीर, जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु
जळगाव- यावल तालुक्यातील सावखेडा येथील नेहा धनराज पाटील वय २२ ही गरोदर विवाहिता जळाल्याची घटना बुधवारी रात्री १२ सुमारास घडली. ६५ टक्के जळाल्याने तिची प्रकृती चिंताजनक असून जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे. दरम्यान जळाल्याने या विवाहितेचे गर्भातील सहा महिन्यांचे बाळ गुदमरुन त्याचा मृत्यू झाला आहे. या विवाहितेला तिच्या सासरच्या मंडळींनी पेटवून दिल्याचा आरोप विवाहितेच्या वडीलांसह नातेवाईकांनी केला आहे. व त्याच्यांवर कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे.
इंदोर येथील माहेर असलेल्या नेहा धनराज पाटील हिचा २९ रोजी रात्री ८ वाजता जळाल्याने तिचे पती तसेच सासर्यांच्या मंडळींनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. यानंतर सासरच्या मंडळींनी नेहाच्या वडीलांसह माहेरच्या नातेवाईकांना फोनवरुन प्रकार कळविला. त्यानुसार गुरुवारी सकाळी इंदोर येथून नेहाचे वडील भीमा पाटील, काका अर्जून पाटील, मामा तसेच इतर नातेवाईक जळगावात आले. नेहा ही गरोदर होती. जळाल्यानंतर तिला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. ६५ टक्के जळाल्याने तिच्या गर्भातील बाळाचाही गुदमरुन मृत्यू झाला. शुक्रवारी सकाळी ८ वाजता मयत बाळासह तिची अचानक प्रसूती झाली.
सासर्यांनी पेटवून दिल्याचे नेहाने सांगितले
वडीलांसह नातेवाईकांनी नेहाला झाल्याप्रकाराबाबत विचारपूस केली. त्यावर नेहाने पती, तसेच सासू, सासर्यांनी एका खोलीत बंद करुन बुधवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास अंगावर रॉकेल टाकून पेटवून दिले. तसेच आरडाओरड केली तसेच कुणाला सांगितले तर उपचार करणार नाही, अशी धमकी दिल्याचे सांंगितले, अशी माहिती नेहाचे वडील भीमा पाटील यांनी दिली. नेहाच्या लग्नाला तीन वर्ष झाले आहे. तिला एक दीड वर्षाचा मुलगा आहे. लग्न झाल्यापासून काही ना काही कारणावरुन सासू तसेच सासर्याकडून तिचा शारिरीक व मानसिक छळ सुरु होता. त्यामुळे नेहाचे पतीसह सासू तसेच सासर्यांनी तिला पेटवून दिल्याचा संशय असून त्यांच्याविरोधात पोलिसात तक्रार देणार असल्याचेही भिमा पाटील यांनी सांगितले. तसेच नेहाच्या सासर्यांवर कारवाई व्हावी, अशी मागणी त्यांनी बोलतांना केली.