गर्दी टाळण्यासाठी मध्य रेल्वेतर्फे चार विशेष गाड्या

0

भुसावळ : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गावाकडे परतीसाठी नागरीक निघाल्याने अनेक गाड्यांना गर्दी वाढत असल्याने रेल्वे प्रशासनाने एका दिवसासाठी चार विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

या गाड्यांचा प्रवाशांना दिलासा
डाऊन 02017 मुंबई-हावडा विशेष गाडी गुरुवार, 20 मार्च रोजी सायंकाळी 5.15 वाजता निघाली असून रविवारी दुपारी 12.15 वाजता हावडा स्टेशनला पोहोचणार आहे. या गाडीला दादर, कल्याण, इगतपुरी, नाशिक, भुसावळ, अकोला, बडनेरा, वर्धा, नागपूर, गोंदिया, दुर्ग, रायपूर, बिलासपूर, रायगढ, झारसुगडा, राउलकेला, टाटानगर, खरगपूर या ठिकाणी थांबा देण्यात आला आहे. डाऊन 01071 पुणे-बल्लारशाह विशेष गाडी शनिवार, 21 रोजी सायंकाळी साडेपाच वाजता सुटल्यानंतर रविवारी दुपारी तीन वाजता बल्लारशाह स्थानकावर पोहोचेल. या गाडीला लोनावळा, कल्याण, वसई रोड, विरार, पालघर, वापी, बलसाड, नवसारी, भेट, चल्थान, नंदुरबार, अमळनेर, धरणगाव, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगांव, अकोला, बडनेरा, धामणगाव, वर्धा, हिंगनघाट, चंद्रपूर रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. डाऊन 01057 लोकमान्य टिळक टर्मिनस-मांडूयाडीह विशेष गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकातून शनिवार, 21 रोजी रात्री 12.45 वाजता सुटल्यानंतर दुसर्‍या दिवशी पहाटे 04.45 वाजता मंडुआडीह पोहोचेल. या गाडीला कल्याण, इगतपुरी, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज चोकी, वाराणसी रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. डाऊन 01499 पुणे-दानापूर विशेष गाडी पुणे येथून शुक्रवारी रात्री साडेआठ वाजता सुटल्यानंतर दुसर्‍या दिवशी रविवारी सकाळी सात वाजता दानापूरला पोहोचेल. या गाडीला हडपसर, अहमदनगर, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, प्रयागराज चोकी, पंडित दिन दयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा या स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.