गर्भपाताच्या मर्यादा वाढीला मंत्रिमंडळाची मंजुरी; २४ व्या आठवड्यात गर्भपातला परवानगी !

0

नवी दिल्ली: केंद्रीय मंत्रीमंडळाने आज बुधवारी 29 जानेवारी रोजी मेडिकल टर्मिनेशन प्रेग्नेंसी विधेयकात दुरुस्ती केली आहे. त्यामुळे मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नेंसी कायदा, १९७१ मध्ये सुधारणा करण्यात येणार आहे. हे नवे विधेयक येत्या संसदेच्या अधिवेशनात मांडले जाणार आहे. याद्वारे महिलांना यापूर्वी गर्भपातासाठी असलेली २० आठवड्यांची मर्यादा वाढवत २४ आठवड्यांपर्यंत वाढवण्यात आली आहे.

मंत्रिमंडळाच्या निर्णयांची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. “२० आठवड्यांत गर्भपात केल्यानंतर आईच्या जीवाला धोका निर्माण होऊन मृत्यू झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे २४व्या आठवड्यात गर्भपात करणे महिलांसाठी सुरक्षित राहिल.