गर्भलिंग तपासणीला आधार कार्ड जोडावे

0

मुंबई । राज्यातील गर्भलिंग निदान तपासणी केंद्र बंद असल्यामुळे राज्यातील विवाहित दाम्पत्य गोवा, मध्य प्रदेश, गुजरात, कर्नाटक, छत्तीसगड व तेलंगणा आदी राज्यांत जाऊन सासरचे किंवा माहेरचे पत्ते देऊन गर्भलिंग निदान केले जात आहे, हे प्रकार रोखण्यासाठी आधार कार्ड गर्भलिंग तपासणीला जोडले जावे, अशी मागणी आमदार नीलम गोर्‍हे यांनी विधानपरिषदेत तारांकित प्रश्‍नाच्या माध्यमातून केली. यास लेखी उत्तर देताना आरोग्यमंत्री यांनी शासन अद्याप, तरी याबाबत विचाराधीन नसल्याचे सांगितले.

इतर राज्यांतून होतेय गर्भलिंग तपासणी
राज्यात 8 हजार 36 सोनोग्राफी केंद्रे कार्यान्वित आहे. या केंद्रात कायद्याच्या तरतुदीनुसार गर्भलिंग निदान तपासणी करण्यास प्रतिबंध करण्यात आले आहे. मात्र, राज्यातील काही विवाहित दाम्पत्य सीमेलगतच्या इतर राज्यांमध्ये जाऊन सोनोग्राफी करत असल्याचे निदर्शनात आले असल्याची कबुली आरोग्यमंत्री यांनी दिली. राज्यभरातून याबाबत तक्रारी प्राप्त होत आहे. शासन यावर लक्ष ठेवून असून गर्भलिंग तपासणी करणार्‍यांविरोधात कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.