गर्भवतीची रस्त्यावरच प्रसूती!

0

जळगाव । शहरातील गोविंदा रिक्षा स्टॉपजवळ खान्देश सेंट्रलकडे जाणार्‍या रस्त्यावर मंगळवारी दुपारी भर उन्हात एका वेडसर महिलेची प्रसूती झाली. रस्त्यावरून जाणार्‍या नागरिकांनी पोलिसांना कळविल्यानंतर 108 रूग्णवाहिकेच्या मदतीने बाळाची नाळ कापून दोघांना जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले. दरम्यान, बाळ आणि महिलेची प्रकृती ठणठणीत असल्याचे वैद्यकिय अधिकार्‍यांनी बोलतांना सांगितले.

महिलेसह बालकाची प्रकृती ठणठणीत
शहरातील खान्देश सेंट्रलच्या दक्षिणेकडील प्रवेशव्दार असलेल्या गोविंदा रिक्षा स्टॉपजवळ रस्त्याच्या बाजूला साधरण 25 ते 30 वर्षींय वेडसर महिला ही बाळंत झाली. खालीमान घालून बसलेल्या अवस्थेत तीने बाळाला जन्म दिल्याने रस्त्याने येणार्‍या जाणार्‍यांचे कोणाचेही लक्ष जात नव्हते. मात्र, दुचाकीस्वार विश्‍वेस सुवर्णकार यांच्या नजरेस ही महिला पडली. विश्‍वसने मदत मागितली मात्र मदतीसाठी कोणाही पुढे आले नाही. शेवटी त्याने जिल्हा रूग्णालय, पोलीस व सर्वांत शेवटी माध्यमाच्या फोटाग्राफरांशी संपर्क साधला. माध्यमांचे प्रतिनिधी आल्यानंतर लगेच सहाय्यक पोलिस निरीक्षक आशिष रोही, अनिता वाघमारे, अमोल विसपुते, आशिष शेलार, रतन गिते आदी हजर झाले.

जिल्हा शल्रचिकित्सकांची मदत
दरम्यानच्या वेळेत विश्‍वसेने आपले प्रयत्न सुरू ठेवले होते. महापालिकेच्या शाहू महाराज रूग्णालयात धाव घेतली. मात्र, तेथील स्टॉफ नसल्याने येण्यास स्पष्ट नकार दिला. याप्रसंगी माध्यम प्रतिनिधींनी अ‍ॅम्ब्युलसह जिल्ह शल्यचिकीत्सकांना फोन लावला. यानंतर जवळपास 45 मिनीटांनी 108 अ‍ॅम्ब्युलन्स आली. अ‍ॅम्ब्युलंसमधील डॉक्टरांनी शास्त्रीय पध्दतीने वार कापल्यावर बाळंतीणीसह नवजात बालीकेला घेवून महिलेसह बाळाला उपचारार्थ जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी पोलीस, पत्रकार, पेट्रीशा हैसत, विजय पांढरे, विश्‍वेश सुवर्णकार, नरेन्द्र शिरसाठ, विशाल सोनवणे यांच्यासह काही नागरिक यांनी मदत केली.

महिला मध्य प्रदेशातील !
जिल्हा रूग्णालयात बाळ आणि महिलेची स्वच्छता केल्यानंतर बाळाचे वजन केले असता 2 किलो 525 ग्रॅम भरले. महिलेला एका आदिवासी समाजाच्या महिलेच्या माध्यमातून विचारणा केली असता तिने स्वत:चे नाव अनिता मंगेश बारेला रा.ता.खरगोन, जि.बडवानी असल्याचे सांगितले. पती असून नाही सारखे असल्याची त्रोटक माहिती तिने दिली. तसेच गेल्या 4-5 दिवसापासून जळगावात आली असून रेल्वेस्थानकाजवळील धर्मशाळेत राहत असल्याची माहिती तिने सांगितली आहे.