मुंबई। क्रिकेट जगामध्ये नव्हे तर जगामध्ये सर्वात श्रीमंत असलेली संस्था म्हणून बीसीसीआयची ओळख आहे. त्याचबरोबर देशांतील सर्वात श्रीमंत संस्था आहे.या संस्थेने क्रिकेटपटू ,स्पर्धा तसेच त्यामधील बक्षीसे याचे आजपर्यंत कोणताही तपशील दिलेला नाही.मात्र बीसीसीआयने कोट्यवधीचे मुद्रांक शुल्क बुडविल्याचे समोर आले आहे.मात्र बीसीसीआयने खाजगी संस्था आहे त्यामुळे सरकारचे नियम लागू होत नाही असा पदाधिकार्यांनी दावा केला आहे.तपशील देण्याचा नकाराचा पाढा वाचणार्या बीसीसीआयवर राज्य सरकारने कारवाईचा बडगा उगारला आहे.याची सखोल चौकशीचे आदेश दिले आहे.बीसीसीआयने काररनाम्यांचे दस्तावेज सादर न केल्यास जप्तीची कारवाई करण्याची तयारीही मुद्रांक नोंदणी विभागाने सुरू केली आहे.
देशातील सर्वात श्रीमंत संस्था हीने खाजगी संस्था असल्यांचे सांगत आजपर्यंत कोणतेही मुद्रांक शुल्क भरले नव्हते.मात्र आयपीएलचे प्रसारणाचे हक्क खाजगी टिव्ही चॅनेलला विकले त्यावेळेसही मुद्रांक शुल्क भरण्यास नकार दिला आहे.हे प्रकरण न्यायालयात गेल्यावर मुद्रांक शुल्क भरण्याचे आदेश न्यायालयाने दिल्यावर बीसीसीआयने मुद्रांक शुल्कांपोटी 24 लाख रूपये भरले होते.
मुद्रांक आणि नोंदणी विभागाच्या अंमलबजावणी समितीकडून या प्रकरणाची चौकशी सुरू असून बीसीसीआयकडून करारनाम्याबाबतची कागदपत्रे मागविण्यात आली आहेत. त्याची तपासणी करून नियमानुसार पुढील कारवाई केली जाईल. मंडळाने महसूल बुडविला असेल तर तो वसूल केला जाईल. सरकार या प्रकरणाच्या खोलात जाईल.
– चंद्रकांत पाटील, महसूलमंत्री
दोन टक्के दंड वसूल केला जाईल
गेल्या काही वर्षात खेळाडू व अन्य प्रायोजक संस्थांनी केलेले करार याचे चौकशीचे आदेश दिले.चौकशी सुरू केली असून खेळाडूंसमवेत झालेल्या करारनाम्यांचा तपशील मागविला आहे. मात्र तो देण्यास बीसीसीआयने स्पष्ट नकार दिला असून आता कायदेशीर कारवाई करूनच ही मुद्रांक चोरी वसूल करावी लागेल, दोन टक्के दंडही वसूल केला जाईल अशी माहिती सूत्रांनी दिली. भाजपचे आमदार अमित साटम यांनी ही मुद्रांक चोरी सरकारच्या निदर्शनास आणली आहे.