गलंगी ते वढोदे रस्त्यावरील पुलांच्या आजूबाजूला पडलेले खड्डे त्वरित बुजवण्यात यावेत..

चोपडा (प्रतिनिधी):- अंकलेश्वर ते बऱ्हाणपूर महामार्गावरील गलंगी (ता.चोपडा) ते वढोदे (ता. यावल) दरम्यानच्या रस्त्यावरील नदीनाल्यांवर बांधलेल्या पूलांच्या दोन्ही बाजुस खुपच मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. या खड्ड्यांमुळे वाहनधारकांना मरणयातना सहन कराव्या लागत आहेत. पर्यायाने दिवसागणिक लहानमोठे अपघात होण्याचे प्रमाण वाढत आहे. संबंधित विभागाने हे खड्डे त्वरित भरावेत. अन्यथा लवकरच रास्तारोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा चोपडा मार्केट कमेटीचे माजी संचालक जगन्नाथ बाविस्कर (गोरगावले बुद्रुक) यांनी ह्या पत्रकांन्वर दिला आहे.