गलथान कारभारानंतर अमळनेरातील वायसीएम केंद्राची आता सारवासारव

0

अमळनेर :- प्रताप महाविद्यालयातील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या केंद्राच्या बेजबाबदार प्रक्रियेमुळे वर्षभराचे नुकसान झाल्याचा आरोप तृतीय वर्षाचा विद्यार्थी लक्ष्मीकांत सोनार याने केला होता. मात्र, लक्ष्मीकांतने ऑनलाईल अर्ज अपूर्ण भरून सोडून दिला आहे, ही माहिती केंद्राला न कळविता ऑफलाईन अर्ज भरल्यामुळे तांत्रिक अडचणींनी प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नसल्याचे स्पष्टीकरण केंद्रातर्फे देण्यात होते. मात्र विद्यापीठाकडे कुठलीच ऑफलाईन प्रोसेस नसल्याचे नाशिक सेंटरचे म्हणणे असून तसा ई मेल लक्ष्मण सोनार याला प्राप्त झाला आहे. दरम्यान, लक्ष्मणला ऑक्टोबरमध्येच परीक्षा देता येणार असल्याने त्याचे वर्ष वाया जाणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर केंद्रावर कारवाई व्हावी, अशी मागणी आता होत आहे.

केंद्राचे म्हणणे काय?
लक्ष्मीकांत याने ऑनलाईन अर्ज भरला मात्र काही अडचणींमुळे शिष्यवृत्ती व्हेरीफाईड झालेली नसल्याने तो अर्धावरच अडकला. त्यानंतर तो अर्ज तसाच सोडून त्याने केंद्राला कसलीही माहिती न देता थेट ऑफलाईन कागदपत्रे जमा करण्याची प्रोसेस केली. ती कागदपत्रे नाशिक सेंटरला पाठविल्याचे केंद्राचे म्हणणे आहे. दरम्यान, ऑनलाईन अर्ज अर्ध्यावरच अडकला असल्याने त्याचे रजिस्ट्रेशन आधीच दाखवत होते. तो अर्ज विद्यापीठालाही डिलीट करता येत नाही आणि या तांत्रिक बाबीमुळे त्रृटी न आल्याने केंद्राला याबाबतीत कसलीच कल्पना मिळाली नाही. जेव्हा हा विद्यार्थी हॉलतिकिट घ्यायला आला 23 मे रोजी तेव्हा माहिती काढली असता हा सर्व प्रकार समोर आल्याचे पराग पाटील यांनी सांगितले होते.

नाशिक सेंटरचे स्पष्टीकरण
ऑफलाईन अर्ज पाठविल्याचे स्पष्टीकरण केंद्रातर्फे पराग पाटील यांनी दिले मात्र, विद्यार्थी लक्ष्मण सोनार याला मिळालेल्या ई- मेल मध्ये म्हटले आहे की, ही त्या सेंटरची चुकी असून कुठलाही ऑफलाईन अर्जाची प्रोसे विद्यापीठात नसून आपण स्टडी सेंटरलाच याची विचारणा करावी, तुम्ही फि तिकडे भरली असल्याने हा विषय स्टडी सेंटरचा येतो. तुम्ही दोघी हा विषय सोडवावा, असा ई-मेल यशवंतराव मुक्त विद्यापीठाच्या नाशिक सेंटरतर्फे लक्ष्मण सोनार याला पाठविण्यात आला आहे.

विद्यार्थ्याचे म्हणणे
मागील वर्षाच्या 8 व्या महिन्यात लक्ष्मीकांत सोनार ने अडमिशन घेतली आणि ती प्रताप महाविद्यालय सेंटरने चेक करीत मान्य ही केले, पुढे मुक्त विद्यापीठातर्फे दिली जाणारी पुस्तके मिळाली, घरी अभ्यासक्रमाच्या वह्या सुद्धा मिळाल्या आणि त्या भरून अमळनेर प्रताप महाविद्यालयाच्या मुक्तविद्यापीठाच्या केंद्रात स्वाक्षरी समवेत जमा हि करून घेतल्या मात्र ऐन परीक्षाच्या वेळेस जेव्हा हॉलतिकीट घेण्याची वेळ आली तेव्हा मात्र ऑनलाइन आणि ऑफलाईन कुठल्याच पद्धतीने हॉलतिकीट तुला भेटणार नाही आता पुढील वर्षी तुला प्रवेश घ्यावा लागेल असे मुक्त विद्यापीठाचे केंद्र संयोजक पी. पाटील यांनी सांगितल्याने वर्ष वाया जात असल्याचे लक्ष्मीकांतने म्हटले होते. दरम्यान, लक्ष्मीकांत ने नाशिक येथे संपर्क साधला असता मुख्य संचालकांशी त्याचे बोलणे झाले. त्यांच्या म्हणण्यानुसार आता उत्तरपत्रिका छपाई झाल्या असल्याने आता ऑक्टोबरमध्ये पेपर देता येतील, असे त्यांनी सांगितलल्याचे लक्ष्मीकांत ने सांगितले असून, प्रताप महाविद्यालयातील केंद्राच्या गलथान कारभारामुळे मला अडचणींचा सामना करावा, लागत आहे. ऐन परीक्षेच्यावेळी अ‍ॅडमिशन नसल्याची माहिती मिळते. हा कसला कारभार, असा प्रश्‍न त्याने उपस्थित केला आहे. दरम्यान, केंद्रावर कारवाई व्हावी, अशी मागणी होत आहे.