गलवानमधून सैनिकांच्या माघारीनंतरही राहुल गांधींकडून तीन प्रश्न !

0

नवी दिल्ली: गलवान खोऱ्यातील रक्तरंजित संघर्षानंतर सीमेवरील वातावरण तापलेले असताना दुसरीकडे राजकारण तापले आहे. काल चीनी सैनिक दोन किलोमीटरपर्यंत मागे हटले आहे. भारतीय सैनिकही मागे हटले आहे. तणाव कमी करण्याच्या दिशेने पावले उचलण्यात आली आहे. त्यातच विरोधी पक्ष आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी या घटनेवरून सरकारला सातत्याने लक्ष केले आहे. वारंवार प्रश्नांचा भडीमार केला आहे. आजही कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी सरकारला तीन प्रश्न केले आहे.

गलवान खोऱ्याच्या सार्वभैमत्वाचा उल्लेख परराष्ट्र मंत्रालयाच्या वक्तव्यात का नाहीय?

राष्ट्रहीत सर्वोच्च असून त्याचे रक्षण करणे ही भारत सरकारची जबाबदारी आहे.

१. तणाव निर्माण होण्याआधीची परिस्थिती ‘जैसे थे’ कायम ठेवण्यावर का भर देण्यात आला नाही?

२. आपल्या हद्दीत २० निशस्त्र जवानांची हत्या करणाऱ्या चीनला ते योग्य आहेत हे ठरवण्याची संधी का दिली?

३. गलवान खोऱ्याच्या सार्वभैमत्वाचा उल्लेख परराष्ट्र मंत्रालयाच्या वक्तव्यात का नाहीय?

हे तीन प्रश्न राहुल गांधी यांनी सरकारला विचारले आहेत.

राहुल गांधी यांच्याकडून संरक्षण क्षेत्रासारख्या विषयावरून प्रश्न उपस्थित केले जात असल्याने त्यांच्यावर टीका होत आहे. भाजपकडूनही राहुल गांधी यांच्या या कृतीवर शंका उपस्थित केली जात आहे.