शिरपूर । अज्ञात दरोडेखोरांनी गणेश कॉलनीतील राहणार्या 45 वर्षीय महिलेला गळफास देऊन खून केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. नफीसाबी दिदार खाटीक असे मृतक महिलेचे नाव आहे. खून केल्यानंतर सोन्याचा नेकलेस दरोडेखोरांनी नेला असून बाजूचे कपाटसुध्दा तोडण्याचा प्रयत्न केला आहे.
मात्र मयताच्या अंगावरील दागिने तसेच सोडून ते निघुन गेल्याने तर्कवितर्क लढविले जात आहेत. मारेकर्यांनी घरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्याचा सेटपबॉक्स नेल्यामुळे नेमके ते कोण होते? समजू शकले नाही. शिरपूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. भरदुपारी ही घटना घडली मृतक महिलेचा मुलगा अतिफ दुपारी घरी आला. तेव्हा ही घटना उघडकीस आली. दिदार खाटीक हे शहरातील गणेश कॉलनीत पाण्याच्या टाकीजवळील प्लॉट नंबर 1 मध्ये परिवारासह राहतात. त्यांचा बोंबील व अंडे विक्रीचा व्यवसाय आहे.