गळफास घेऊन एकाची आत्महत्या

0

भुसावळ। शहरातील नसरवांजी फाईल, हिंदुस्थानी मशीदीजवळील रहिवासी असलेल्या अशपाक हसरत बेग यांनी शुक्रवार 4 रोजी सकाळी 11 वाजेपूर्वी कुठल्यातरी कारणाने गळफास घेऊन आत्महत्या केली.

या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात सरफराज खान सत्तार खान यांनी खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास एएसआय रफिक काझी करीत आहेत. आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही.