गळफास घेऊन युवकाची आत्महत्या

0

वरणगाव । शिवाजी नगरमधील रहिवाशी कुमार (छोटू) लक्ष्मण गिरणारे (वय 40) याने राहत्या घरात छताच्या हुकाला दोरीच्या साह्याने गळफास घेतल्याची घटना 15 दुपारी 4.30 वाजेच्या दरम्यान उघडकिस आली. वरणगाव पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. कुमार गिरणारे हा शिवाजी नगरमध्ये एकटा राहात होता. त्याचे लग्न होत नव्हते. त्याचा भाऊ मुबंई येथे पोलिस आहे. 15 रोजी 4.30 वाजेच्या सुमारास त्याने टेन्शनमध्ये गळफास घेवून आत्महत्या केली. कमलेश अरुण येवले (राहणार शिवाजीनगर, वरणगाव) यांनी दिलेल्या खबरीवरून वरणगाव पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल सुनील वाणी करीत आहे.