गळफास घेऊन युवकाची आत्महत्यायेथील महात्मा फुले पुतळ्या जवळील रहिवाशी असलेल्या ४० वर्षीय युवकाने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण समजु शकले नाही. याबाबत माहिती अशी कि, शहरातील महात्मा फुले यांच्या पुतळा परिसरात राहणारे किशोर उर्फ भैया पंढरीनाथ महाजन (वय-४०) या युवकाने आज सकाळी १० वाजेच्या पुर्वी घरातच एकटाच असतांना घरात लहान मुलाच्या बांधलेल्या झोक्याच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.मयत किशोर महाजन याने काही वर्षांपुर्वी सैन्य दलाचे प्रशिक्षण पुर्ण केले होते.याच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, लहान भाऊ व आई असा परिवार असुन आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. किशोर याच्यावर सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. याबाबत रवींद्र माधवराव महाजन यांनी दिलेल्या माहित वरून पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पो.नि. अरुण हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि नारायण पाटील तपास करीत आहे.