गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला आठ वर्षीय मुलाचा मृतदेह

0

पिंपरी-चिंचवड : गळफास घेतलेल्या अवस्थेत आठ वर्षाच्या मुलाचा मृतदेह आढळला. हा प्रकार निगडी येथील अप्पूघर उद्यानाच्या मागच्या बाजूला सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास उघडकीस आला. नकूल कुलकर्णी (वय 8, रा. श्री विहार सोसायटी, सिद्धी विनायकनगरी) असे मुलाचे नाव आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, नकूल हा आपल्या आजी-आजोबांसोबत राहत होता. नकूल याची 6 मे ला मुंज होती. त्यासाठी त्याचे आई-वडील, आजी-आजोबा पत्रिका वाटण्यासाठी घराबाहेर गेले होते. नकूल घरात एकटाच होता. दुपारी दोनच्या सुमारास नकुलचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. परंतु त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली की त्याला गळफास लागला, हे अद्याप समजू शकले नाही. देहूरोड पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.