गळफास घेवुन विवाहितेची आत्महत्या

0

चाळीसगाव । नवविवाहितीने रहात्या घरात गळपास घेवुन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी 4 फेब्रुवारी दुपारी 2 वाजता गणेशपुर ता.चाळीसगाव येथे घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, वाडा ता.कन्नड येथील माहेर व गणेशपुर ता.चाळीसगाव येथील सासर असलेल्या सविता विजय मोरे वय.20 हिचे चार महिण्यांपुर्वीच लग्न झाले होते. सविता मोरे यांचे पती हे रिक्षाचालक आहेत. सोमवारी दुपारी सविता मोरे हिने रहात्या घरात गळपास घेवुन आत्महत्या केली. चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी अधिक तपास सहायक पोलीस निरिक्षक आर.बी.रसेडे करीत आहेत.