जळगाव । काकाच्या घरात कोणीही नसतांना अठरावर्षीय तरूणाने पंख्याला दोरीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या करण्याच्या प्रयत्न सकाळी 8.30 वाजेच्या सुमारास उघडीस आल्याची घटना शहरातील नवी जोशी कॉलनी परीसरात घडली. मात्र वेळीची मित्रांच्या लक्षात आल्याने तरूण बचावला असून जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आला आहे. प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेली माहिती अशी की, परेश नरेश जोशी (वय-18) रा. नवी जोशी कॉलनी हा रिक्षा चालक आहे. वडील नसल्याने तो आईसह राहतो. आई बाहेर दुसर्यांच्या घरी धुणेभांडीचे काम करते तर मागच्याच गल्ली त्याचे काका राहतात. सोमवारी 6 ऑगस्ट रोजी सकाळी 8.30 वाजेच्या सुमारास काकांच्या घरात कोणी नसतांना पंख्याला दोरीच्या सहाय्याने आत्महत्या करण्यासाठी स्टुलवर चढला आणि दोरी गळ्यात आवळून घेतली, याचवेळी त्याचे गल्लीतील मित्र त्याला बोलवण्यासाठी आले असता तो आत्महत्या करत असल्याचे दिसून आले. त्यांनी त्याला तात्काळ आवळलेल्या दोरी गळ्यातून काढून खासगी रिक्षाने जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल केले. या घटनेतून बचावला असून आता प्रकृती स्थिर आहे. आत्महत्या करण्याचे नेमके कारण काय आहे हे त्याला विचारणा केली असता, मी आत्महत्या करण्यापुर्वी एक पिवळी चिठ्ठी लिहून काढली आहे. त्यात सर्वकाही नमूद केले आहे. परेश हा प्रचंड घाबरलेल्या अवस्थेत असल्याने तो कोणत्याही विषयावर बोलण्यास तयार नसल्याने नातेवाईकांकडून बोलले जात होते.