चाळीसगाव । तालुक्यातील ओझर येथील 54 वर्षीय इसमाचा मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितीत तालुक्यातील टेकवाडे येथील शेतात गुरूवार 6 जुलै रोजी रात्री 8 वाजेपूर्वी संशयास्पद स्थितीत मिळून आला होता. त्यांनी आत्महत्या केली सून उसनवारीचे पैसे मागितल्याच्या कारणावरून टेकवाडे येथील पिता – पुत्रांनी त्यांचा खून केल्याचा आरोप मयताच्या सैनिक असलेल्या दोघा मुलांनी केला असून घटनेचा तपास मेहुणबारे पोलिसांकडून काढून डीवायएसपी चाळीसगाव यांनी करावा व टेकवाडे येथील पिता पुत्रांवर खुनाचा गुन्हा दाखल करावा तसे न झाल्यास आजी – माजी सैनिकांसह चाळीसगाव पोलिस स्टेशनसमोर आमरण उपोषणास बसण्याचा इशारा दोघा सैनिक भावांनी पत्रकार परिषदेत दिला.
पैशाच्या कारणावरून खूप केल्याचा आरोप
कैलास सुपडू सोनवणे यांनी टेकवाडे येथील शिवाजी हिरामन गोसावी यांना दुकानात माल भरण्यासाठी जवळपास 3 लाख रूपये उसनवार दिले होते. वडील नेहमी त्यांना पैसे मागत असत मात्र त्यांनी पैसे दिले नाही. 6 जुलै रोजी आरोपी शिवाजी गोसीवी याने त्याचे वडीलांना टेकवाडे येथे सकाळी बोलावले त्यावर आईने हा प्रकार पंजाब येथे सैन्य दलात असलेल्या मुलांने सांगितल्यावरून वडीलांना शेतात बसल्याचे सांगितले. पोलिस पाटलांच्या मदतीने त्यांनी मृतदेह खाली उतरवल्याचे सांगत घटनास्थळाची पाहणी केली असता त्यावरून वडीलांचा पैशाच्या कारणावरून आरोपी शिवाजी हिरामन गोसावी व त्याचा मुलगा विद्यानंद उर्फ दादु शिवाजी गोसावी यांनी वडीलांचा खून केला असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले. त्याचप्रमाणे आरोपी व पोलिस पाटील हे मेहुणबारे पोलिस स्टेशनला गेल्यानंतर बराच वेळ बसले व पोलिस देखील घटनास्थळावर उशिरा आल्याचे म्हटले आहे.
चौकश न झाल्यास आंदोलनाचा इशारा
मेहुणबारे पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल व्हावा म्हणून कैलास सोनवणे यांचा मृतदेह चाळीसगाव शहर पोलिसात आणला होता. फिर्याद घेतांना सपोनि दिलीप शिरसाठ यांनी सांगितल्याप्रमाणे फिर्याद घेतली नसल्याचा आरोप करत ते घटनेची योग्य चौकशी करत नाहीत व घटनेशी संबंधित लोकांना वाचविल्याचा प्रयत्न करीत असल्याने त्यांच्याकडील तपास काढून तो तपास डीवायएसपी चाळीसगाव यांनी करावा अशी मागणी निवेदनाद्वारे केली असल्याचे त्यांनी सांगितले. असे न झाल्यास आजी-माजी सैनिकांसह आमरण उपोषणास बसु तरीही न्याय न मिळाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.