इंदापूर । कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याचा चालू गळीत हंगाम 11 एप्रिलपर्यंत सुरू राहील, असा विश्वास माजी सहकारमंत्री व कारखान्याचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केला. कर्मयोगी साखर कारखान्याने उत्पादित केलेल्या 5,55,555 व्या साखरपोत्याचे पूजनानंतर आयोजीत ऊसपीक परिसंवादात ते बोलत होते.
32 हजार एकर उसाची नोंद
पाटील म्हणाले, चालू गळीत हंगामात कारखान्याने पाच लाख मे. टन उसाचे गाळप केले आहे. अडीच महिन्यात सर्वाधिक पाच लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करणारा कारखाना आहे. यावर्षीचा गळीत हंगाम पूर्ण क्षमतेने सुरू आहे. पुढील वर्षी 32 हजार एकर उसाची नोंद झाली आहे. त्यामुळे ऑगस्ट महिन्यापर्यंत कारखाना सुरू ठेवावा लागणार आहे, असे सूतोवाच त्यांनी केले. प्रास्ताविक कार्यकारी संचालक बाजीराव सुतार यांनी केले, रघुनाथ पन्हाळकर व शरद काळे यांनी सूत्रसंचालन केले.
मान्यवरांची उपस्थिती
याप्रसंगी कृषी शास्त्रज्ञ सुरेश माने-पाटील, काँग्रेसचे अध्यक्ष कृष्णाजी यादव, नीरा-भीमा कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार, भरत शहा, भास्कर गुरगुडे, विष्णू मोरे, सुभाष काळे, हनुमंत जाधव, मच्छिंद्र अभंग, अंकुश काळे, यशवंत वाघ, प्रशांत सूर्यवंशी, रमेश जाधव, मानसिंग जगताप, राजेंद्र गायकवाड, राहुल जाधव, अंबादास शिंगाडे, वसंत मोहोळकर, केशव दुर्गे, जयश्री नलवडे, अतुल व्यवहारे, राजेंद्र चोरमले, पांडुरंग गलांडे, सुभाष भोसले उपस्थित होते.