गळ्यात पाटया लावून पंचनामे करता, शेतकरी तुम्हाला गुन्हेगार वाटतात का ?

0

धनंजय मुंडे यांचा संतप्त सवाल; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधकांचा आक्रमक पवित्रा

मुंबई : शेतकऱ्यांच्या गळयात पाटया लावता आणि पंचनामे करता आमचे शेतकरी तुम्हाला गुन्हेगार वाटतात का ? असा संतप्त सवाल करत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारवर हल्लाबोल केला. शेतकऱ्यांची कर्जमाफी,बोंडअळीचा प्रार्दुभाव,गारपीट आणि धर्मा पाटील यांची आत्महत्या या प्रश्नावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी विधानपरिषदेमध्ये स्थगन प्रस्ताव मांडून चर्चा करण्याची मागणी केली.

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक होताना धनंजय मुंडे यांनी १७ जिल्हयात एकही कर्जमाफी झालेला शेतकरी भेटला नसल्याचे सांगितले. डिसेंबरमध्ये झालेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये जाहीर केलेली बोंडअळीची नुकसान भरपाई मिळालेली नाही. गारपीटीची नुकसान भरपाई मिळालेली नाही.धर्मा पाटील यांना मृत्यूनंतरही न्याय मिळालेला नाही. शेतकऱ्यांना मदत करण्याचे दुरच त्यांच्या गळयात पाटया अडकवणाऱ्या मुद्यावर धनंजय मुंडे यांनी सरकारला धारेवर धरले.