गस्ती दरम्यान रेल्वे पोलीसांनी पकडले मोबाईल चोरट्यांना

0

जळगाव । रेल्वे स्थानकावर गस्तीदरम्यान संशयावरून रेल्वे पोलिसांनी मोबाईल चोरट्यांना ताब्यात घेतले. खाकीचा हिसका दाखविला असता संशयितांनी चोरीची कबूल देत मोबाईल काढून दिले असून 25 व 26 जानेवारी या दोन दिवसात रेल्वे पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून चोरीचा ऐवज जप्त केला आहे. रेल्वे पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक खलील शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल योगेश चौधरी, हिरालाल चौधरी, अनिल नायडू, राजेश पुराणिक, रामराव इंगळे या कर्मचाजयांनी ही कामगिरी केली.

25 रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास गस्तीवर असलेल्या दोन इसम संशयास्पदरित्या फिरताना आढळून आले़ त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले़ खाकीचा हिसका दाखविताच दोघांनी मोबाईल चोरीची कबूली दिली व दोन मोबाईल काढून दिले़ शेख सैय्यद रफीक अहमद व शेख साबीर शेख अब्दुल दोघे रा. मालेगाव अशी संशयितांची नावे आहे. त्याच्याकडील मोबाईलचा पासवर्ड उघडण्यास सांगितले चोरीचा पर्दापाश झाला. पिंप्राळा येथील बाजारातून दोघांनी मोबाईल चोरल्याचे कबूल दिले. त्यानुसार त्यांना रामानंदनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. 14 हजार 500 रूपये किमतीचे दोन मोबाईल चोरीप्रकरणी रामानंद पोलिसात गुन्हा दाखल आहे.

पंडीत रमेश बाविस्कर रा़.कांचननगर हे प्रवासाला निघाले होते़ 26 रोजी सकाळी 8.30 वाजता रेल्वेस्थानकावर तिकीट काढत होते. यादरम्यान त्यांची कपडे तसेच दागिणे व रोख रक्कम असा 8 हजार 300 रूपयांचा ऐवज असलेली बॅग चोरट्याने लांबविली. त्यांनी रेल्वे पोलिसात तक्रार केली. काही तासातच पोलिसांनी शांतीलाल अनारसिंग राठोड छनोरा, छेदवानी, जि.ख़ंडवा (मध्य प्रदेश) याला शिवाजीनगरातून अटक केली़ त्याच्याकडून बॅग हस्तगत करण्यात आली. त्याव्यतिरिक्त एक मंगळसूत्र, चांदीचे दोन चांदीचे वेले, रोख 2 हजार 50 रूपये एकूण 18 हजार 600 रूपयांचा ऐवजही त्याच्याकडून जप्त करण्यात आला असून मूळ मालकांचा पोलीस शोध घेत आहेत.

नागरिकांनी दिला चोप
सैय्यद शेख शकील सैय्यद अपसर राख़डका रोड, भुसावळ हे नवजीवन एक्स्प्रेसने भुसावळकडे जात होते़ दरवाजात बसलेले असताना चोरट्याने त्यांच्या हाताला झटका दिला व मोबाईल लांबविल. लेंडी नाल्याजवळून पळून जात असताना नागरिकांनी संशयिताला पकडले. त्याला चोप देत रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन केले. किरण वसंत पवार,रा.शिवाजी नगर असे संशयिताचे नाव आहे.