नवी दिल्ली । रविवारी भारत व पाकिस्तान याच्या चॅम्पियन ट्रॉफीचा अतिम सामना रंगला असतांना दुसरीकडे भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली आणि वीरेंद्र सेहवाग यांच्यात या सगळ्या ओघात कालच्या सामन्यातील समालोचनादरम्यान रंगलेल्या जुगलबंदी.मात्र याकडे सर्वाचे दुर्लक्ष झाले. भारत पाक सामना सुरू असताना चर्चेचा ओघ एकेरी, दुहेरी आणि चोरट्या धावा काढण्याच्या कौशल्याकडे वळला. त्यावेळी सौरव गांगुलीने विराट कोहलीचे कौतुक केले. यावर सेहवागने तत्त्परतेने, माझा एक माजी सहकारी याबाबत खूपच गुणवान होता, असे म्हणत सौरव गांगुलीला डिवचले.त्यानंतर सेहवागने थेट गांगुली व विराटच्या रनिंग बिटविन द विकेट तुलना करण्यास प्रारंभ केला.
हे सर्व सुरू असतांना गागुलीने थेट सेहवागला धावण्याच्या स्पर्धाचे आव्हान दिले.मैदानावर भेटू असे बोलल्यानंतर सेहवागने त्यावर दादा तुला या शर्यतीत पहिले यावे लागेल, असे खोडकरपणे म्हटले. तेव्हा गांगुलीने लगेच, तुला अजूनही भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदासाठी माझ्यासमोर मुलाखत द्यायची आहे, हे लक्षात ठेव अशी प्रेमळ धमकी दिली. त्यासाठी तू स्वत:चे आकडेवारीचे ज्ञान तपासून पाहायला पाहिजेस. जेणेकरून तू इतरांबद्दल काहीही बरळणार नाहीस. शेवटी एक लक्षात ठेव की, तुझा इंटरव्ह्यू मीच घेणार आहे, असे गांगुलीने म्हटले. त्यानंतर सेहवागने विषय हसण्यावारी नेत पुढे काहीही बोलायचे टाळले.