गांजाची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक

0

शिरपूर पोलीसात गुन्हा दाखल
दोघांना २९ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी
प्रवाशांच्या सतर्कतेने प्रकार उघडकीस

शिरपुर – शिरपुरहुन पुण्याला जाणारी खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्या प्रवाशाच्या सतर्कतेने तस्करी करून पुण्याला 46 किलो गांजा घेऊन जाणाऱ्या दोघांना लाखोंचा मालासह शिरपुर पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत माहिती अशी की, शिरपुरहूनहुन पुण्याला जाणारी विजय ट्रॅव्हल्सच्या (एमएच १८ बीजी २९५१) या खाजगी बसने २६ जानेवारी रोजी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास काही प्रवासी प्रवास करण्यासाठी बसस्थानकाजवळ चोपडा जिनसमोर आले होते. त्यांनी त्यांचा सामानाच्या बॅगा गाडीच्या मागील भागात असणारी डिक्कीत वण्यासाठी उघडी केली असता डिक्कीतुन उग्रवास येत असल्याने त्यांनी चालक व वाचकाला सांगितले. वाहक व चालकांनी चौकशी करून शिरपुर पोलिसांना माहिती दिली.

बसस्थानकावर केली कारवाई
शिरपुर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन गाडीची तपासणी केली असता मेंदूवर परिणाम करणारे आंबट, उग्र वासाचा ओला पाला असलेला गांजा हा अमली पदार्थ दिसून आला. याप्रकरणी दीपक घाटूसिंग बारेला (वय-४० रा.काबरी ता.भगवानपुरा जि. खरगोन ह.मु.दिघी भोसरीजवळ पुणे) व राजा दुर्गा बारेला (वय-२८, रा.काबरी,ता.भगवान पुरा जि. खरगोन) यांच्याकडून १ लाख १४ हजार ६२५ रुपये किमतीच्या ४ बॅगा मधील १० प्लास्टिकच्या पिशव्या भरलेल्या गांजा जप्त केला