गांजा विक्री करणार्‍या महिलेला अटक

0

नवी मुंबई :– एपीएमसी येथे गांजा विकण्यासाठी आलेल्या महिलेला मालमत्ता व अमंली पदार्थ विरोधी पथकाने सापळा रचून सोमवारी दुपारी अटक केली. या महिलेकडून तब्बल 21 हजार रुपये किमतीचा गांझा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी एपीएमसी पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायदा कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कालिंदा उर्फ कविता हिरा कुराळे (46) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. तिच्याकडून 2 किलो 100 ग्रम वजनाचा गांजा पोलिसांनी जप्त केला आहे.

महिलेवर एपीएमसी पोलीस ठाण्यात 3 गुन्हे
यापूर्वीही या महिलेवर एपीएमसी पोलीस ठाण्यात 3 गुन्हे दाखल आहेत. सोमवारी दुपारी एपीएमसी येथील इलाहाबाद बँकेच्या बाजूस एकता नगर झोपडपट्टीत एक महिला गांझा विकत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्या भागात सोमवारी दुपारी 3 ते 4 च्या सुमारास सापळा रचला व त्या महिलेला गांजा विकताना रंगेहाथ पकडले. तिची झडती घेतली असता वरील ऐवज तिच्याकडे आढळून आला. त्याचवेळी तिला अटक करण्यात आली असून तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.