वाडा । तालुक्यातील गांधरे या गावासाठी हिंदुस्थान कोकाकोला बबेव्हरेजेस या कंपनीकडून गांधरे ग्रामपंचायतीला जलशुद्धीकरण यंत्राची भेट देण्यात आली. या यंत्रामार्फत प्रत्येक दिवशी लाख लीटर पाणी शुद्धीकरण करणारे यंत्र देण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन गटविकास अधिकारी पल्लवी सस्ते आणि कोका-कोला कंपनीचे श्रीकांत गोरे यांच्या हस्ते करण्यात आले. सध्या सर्वात जास्त आजार हे पाण्यामुळे होतात. त्यामुळे शुद्ध पाण्याची सर्वांगीण गरज निर्माण झाली आहे. ही गरज लक्षात घेता गांधारे ग्रामपंचायतीकडून कोका-कोला कंपनीकडे अशा जलशुद्धीकरण यंत्रणेची मागणी केली होती.
कंपनीने त्या अनुषंगाने ग्रामपंचायतीला एक लाख लीटर प्रती दिन एवढ्या क्षमतेचे जलशुद्धीकरण यंत्र देण्यात आले. त्या शुद्धीकरण झालेले पाणी आजपासून ग्रामस्थांना मिळण्यास सुरुवात करून देण्यात आली आहे. यावेळी कोका-कोला कंपनीचे हिमांशु आचार्य यांनी पाण्याचे महत्त्व आणि भविष्यातील उद्भवणारे संकटे यामुळे पाणी जपून वापरावे, असा सल्ला त्यांनी ग्रामस्थांना दिला. या कार्यक्रमासाठी कोका-कोला कंपनीचे श्रीगंधा कुलकर्णी, अर्चना माने, कामलेश नारखेड, सूर्यकांत जगदाने तसेच भारतीय कामगार सेनाचे सरचिटणीस किरण अधिकारी, सरपंच अर्चना देवळे, उपसरपंच वीरेंद्र काशिनाथ ठाकरे ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.