अमळनेर । येथील गांधलीपुरा भागातील कुटनंखाने व् अनैतिक देह व्यापार इतरत्र हालविण्यासाठी 25 फेब्रुवारी रोजी एकदिवशीय लाक्षणिक उपोषण डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोरे करण्यात येणार असल्याचे डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक परिषदेचे तालुकाध्यक्ष राम संदानशिव यांनी प्रसिद्धिस दिलेल्या पत्रकाद्वारे दिली आहे.
या आंदोलनाची दखल घेतली न घेतल्यास 14 मार्च रोजी वेश्या वस्तीतील खुल्या मैदानात बेमुदत उपोषण करण्याचा इशारा या पत्रकात देण्यात आला आहे. दरम्यान, येथील न्यायालयाच्या आदेशाने कुंटनखाना सील पोलिसांनी केले दुपारी एपीआय उदयसिंग साळुंखे ,भटुसिंग तोमर, प्रदीप पवार, प्रवीण पारधी, गंगाधर सोनवणे आदींनी कारवाई केली आहे.