गांधली-पिळोद्याच्या बालाजी विद्यालयात माजी विद्यार्थी-शिक्षकांचा मेळावा

0

जळगाव । अमळनेर तालुक्यातील गांधली-पिळोदे येथील बालाजी विद्यालयातील सन 1985 च्या दहावीच्या विद्यार्थी-विद्यार्थीनींचा ‘आठवणींचा मेळा’ हा सेहमिलनाचा कार्यक्रम जळगाव येथील सुप्रसिद्ध जैन उद्योग समुहाच्या जैन हिल्सवरील रम्य परिसरात गुरुकुलवर अतिशय उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी निळकंठराव गायकवाड होते, तर सातपुडा अ‍ॅटोमोबाईल्सचे संचालक प्रा.डी.डी. बच्छाव प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी गुरुंविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पी.ए.सोनवणे, बी.डी.पाटील, माजी प्राचार्य डॉ.डी.डी.पाटील, एस.जे.पाटील, बी.ए.पाटील, निकुंभ सर, वाघ सर, बी.व्ही.चव्हाण, वाय.पी.पवार, एन.यु.पाटील, एस.जी.बडगुजर, शिंदे सर, बी.एस.पाटील, जी.एम.पाटील या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.

मेळाव्यात माजी विद्यार्थ्यांनी दिला आपला परीचय
सर्वांगसुंदर आयोजनाबद्दल संजय पाटील यांचा सपत्नीक व माता-पित्यांसह तसेच सरला शिंदे यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. श्रीमती रश्मी व प्रा. राजेंद्र देशमुख, यशवंत गरुड, हर्षल पाटील यांचाही विशेष सन्मान करण्यात आला. सर्वांनी आपला परिचय करवून दिला. प्रमुख अतिथी म्हणून बोलतांना प्रा. बच्छाव यांनी संस्कार सिंचनासोबतच मानसिक आधार देण्यासाठी शिक्षकांचे योगदान महत्वपूर्ण ठरते असे प्रतिपादन केले तर समारोपात निळकंठ गायकवाड यांनी अनेक समर्पक उदाहरणे देत गुरु शिष्यांच्या पवित्र नात्यावर भाष्य केले. प्रा.राजेंद्र देशमुख यांनी सुत्रसंचालन केले तर, प्रा.जितेंद्र जोशी यांनी आभार व्यक्त केले. या पहिल्याच मेळ्यास मुंबई, पुणे तसेच खान्देश भरातून माजी विद्यार्थी विद्याथीनीनी उपस्थिती दिली. मेळा यशस्वी करण्यासाठी गजानन देशमुख, प्रा.सुनिल गरुड, व माजी विद्यार्थी -विद्यार्थीनीनी परिश्रम घेतले.मेळाव्यानंतर सर्वानी गांधी तिर्थ येथे भेट दिली. त्यानंतर स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेत एकमेकांना शुभेच्छा देऊन पुढच्या मेळ्याच्या ओढीने परतीची वाट धरली.

आयोजन केल्याने कौतूक
प्रा. रश्मी देशमुख यांनी स्वागत व आभारगीत सादर केले. प्रास्ताविकातून मेळ्याचे संयोजक संजय पाटील यांनी सर्वांचे स्वागत करून एकत्रिकरणाचे उद्दीष्ट कथन केले. त्यानंतर माजी विद्यार्थ्यांच्या वतीने सरला शिंदे, विजय कुलकर्णी, महानंदा साळुंखे, लता सोनवणे, चंदाताई वाघ यांनी संस्मरणीय आठवणी जागविल्या. सत्कारार्थी शिक्षकांपैकी माजी प्राचार्य डॉ.डी.डी.पाटील यांनी या पहिल्याच कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल सर्वांचे कौतुक केले.