नवी दिल्ली- राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या प्रतिमेवर गोळ्या झाडणाऱ्या हिंदू महासभेच्या नेत्या पूजा पांडेला अटक करण्यात आली आहे. ३० जानेवारीला महात्मा गांधी यांच्या ७१ व्या पुण्यतिथीच्या दिवशी हिंदू महासभेच्या पूजा पांडेने गांधींच्या प्रतिमेवर गोळ्या झाडल्या. गांधींच्या हत्येची घटना पुन्हा जिवंत करण्याचा प्रयत्न हिंदू महासभेकडून केला गेला. या घटनेविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी पूजा पांडेला पती अशोक पांडेसहीत अटक केले आहे.
उत्तर प्रदेशातील अलीगड येथे हा संतापजनक प्रकार घडला होता. गांधींच्या प्रतिमेवर गोळ्या झाडत यावेळेस नथुराम गोडसेच्या छायाचित्रावर पुष्पहार अर्पण करत मिठाईचे वापट करण्यात आले होते. शिवाय, ‘महात्मा नथुराम गोडसे अमर रहे’च्या घोषणाही दिल्या गेल्या. इतकेच नाही तर हिंदू महासभेने महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी दिनी शौर्य दिवस साजरा केला.
गांधींच्या प्रतिमेवर गोळ्या झाडत यावेळेस नथुराम गोडसेच्या छायाचित्रावर पुष्पहार अर्पण करत मिठाईचे वापट करण्यात आले होते. शिवाय, ‘महात्मा नथुराम गोडसे अमर रहे’च्या घोषणाही दिल्या गेल्या. इतकेच नाही तर हिंदू महासभेने महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी दिनी शौर्य दिवस साजरा केला. ”महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता म्हणणे अयोग्य आहे. जर मी नथुराम गोडसेच्या आधी जन्मले असते, तर मीच महात्मा गांधी यांची हत्या केली असती.”असे संतापजनक वक्तव्यही पूजा शकून पांडेयने केले होते.