गांधीजीचे अर्थशास्त्र हे जीवन व्यवहारांशी संबंधीत!

0

जळगाव । महात्मा गांधी यांनी मांडलेले अर्थशास्त्र हे नौतिक आणि सामाजिक असून त्याचे नाते प्राचीन अर्थशास्त्राशी आहे. भलेही ते अर्थशास्त्राच्या परिभाषेत मांडले गेले नसले तरी गांधीजीचे अर्थशास्त्र हे जीवन व्यवहारांशी संंबंधीत होते. मात्र हे अर्थशास्त्र समाजव्याप्त होऊ शकले नाही हा भारतीय अर्थव्यवस्थेचा पराभव असल्याचे खंत अर्थशास्त्राचे अभ्यासक डॉ.सर्जेराव ठोंबरे यांनी व्यक्त केली. ते उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात केशवस्मृती प्रतिष्ठान व जळगाव जनता बँकेच्या देणगीतून आयोजित डॉ.केशव बळीराम हेडगेवार व्याख्यानमालेप्रसंगी बोलत होते.

हेडगेवार, गांधी कृतीशिल राष्ट्रभक्त
महात्मा गांधी आणि डॉ.केशव बळीराम हेगडेवार हे दोघेही समकालीन होते. समाजासाठी त्यांनी आपल्या आयुष्य समर्पित केले आहे. ते दोघेही कृतीशील राष्ट्रभक्त होते. महात्मा गांधीजीच्या विचारांपासूनन आपण कोसोमैल दुर गेल्याची जाणीव डॉ.हेडगेवार यांना झाल्यामुळे त्यांनी कार्यकर्ते निर्माण केले असे मत डॉ. ठोंबरे यांनी उमवीत व्याख्यानाप्रसंगी व्यक्त केले. त्यांच्या विचाराची अंमलबजावणी होणे ही काळाची गरज असून गांधीजींची शिकवण प्रत्यक्ष आचारणात आणायला हवी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर गरजेकरीता
व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी प्रा.माहूलीकर होते. त्यांनी अध्यक्षीय भाषणात नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर गरजेपूरता केला जावा आणि महात्मा गांधीजींची शिकवण प्रत्यक्ष आचरणात आणायला हावी अशी अपेक्षा व्यक्त केली. अतूल सरोदे यांनी केशव स्मृती प्रतिष्ठानची भूमिका मांडली. उमवी प्रशाळेतील विद्यार्थी व्याख्यानासाठी उपस्थित होते.

यांची होती उपस्थिती
केशवस्मृती प्रतिष्ठान आणि जळगाव जनता बँकेच्या देणगीतून उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात आर्थिक विचार व आजची आर्थिक परिस्थिती या विषयावर अर्थशास्त्राचे अभ्यासक डॉ.सर्जेराव ठोंबरे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी बीसीयुडी संचालक प्रा.पी.पी.माहूलीकर होते. यावेळी जळगाव जनता बँकेचे संचालक डॉ.अतुल सरोदे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आणि प्रास्ताविक उमवी जनसंपर्क अधिकारी सुनिल पाटील यांनी केले.