गांधीधामकडे निघालेल्या विवाहितेसह चिमुकला रेल्वे प्रवासात बेपत्ता

A young married woman who left for Gandhidham went missing from Bhusawla with her child भुसावळ : भुसावळातून गांधीधामकडे निघालेल्या विवाहितेसह एक वर्षीय चिमूकला व 21 वर्षीय तरुणी प्रवासात बेपत्ता झाल्याची बाब उघडकीस आली असून या प्रकरणी भुसावळ लोहमार्ग पोलिसात हरवल्याची नोंद करण्यात आली आहे.

बेपत्ता प्रकरणी भुसावळ लोहमार्ग पोलिसात नोंद
तक्रारदार कलाबाई समाधान भील (45, सांगवी, ता.यावल) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांची मुलगी निलु कान्हा भील (24, वाडी, अंजार, गुजरात, कच्छ), तिचा मुलगा कान्हा (01) व दीपाली दीपक भील (21, दोनगाव, पाळधीजवळ, जि.जळगाव) हे तिघे 22974 गांधीधाम एक्स्प्रेसने 27 नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजता निघाले होते मात्र गांधीधाम येथे संबंधित पोहोचल्या नाहीत. सर्वत्र शोध घेवूनही शोध न लागल्याने भुसावळ लोहमार्ग पोलिसात हरवल्याची नोंद करण्यात आली. तपास नाईक अनिल बैस करीत आहेत.