गांधीनगरातील वकीलाच्या घरी चोरट्यांचा डल्ला

0

जळगाव । शहरातील गांधीनगर जिल्हापेठ येथील रहिवासी अ‍ॅड. बी.ई.यावलकर यांच्या राहत्या घरी चोरट्यांनी बाहेर झोपलेल्या वाचमनला चाकू लावून हातपाय बांधत घरफोडी केल्याची घटना घडली. यावलकर यांचे बंद घराचा कडीकोयंडा कूलूप तोडून चोरट्यांनी 28 ऐवज लंपास केल्याचे आढळून आले. जिल्हापेठ पोलिसांनी परिसरातील सिसीटीव्हीचे फुटेज संकलत करुन चोरट्यांचा तपास चालवला असून या प्रकरणी मात्र संध्याकाळ पर्यंत कुठलीही तक्रार दाखल नसल्याचे पोलिसांनी सांगीतले.

पोलिसांकडून घटनास्थळाची पाहणी
जळगाव शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या गांधीनगर जिल्हापेठ भागात नगरसेविका वर्षाखडके यांच्या घरा समोरच अ‍ॅड. बी.ई.यावलकर वास्तव्यास आहेत. यावलकर कुटूंबीय बाहेरगावी असल्याने घरबंदावस्थेत होते तसेच खासगी सुरक्षारक्षक आधार पाटील राखणदारीला ठेवण्यात आले होते. सोमवार(ता.20) रोजी मध्यरात्रीनंतर मारुती व्हॅन मध्ये आलेल्या अज्ञात चोरट्यांनी घराच्या कंपाऊंड मध्ये प्रवेश करीत सुरक्षा रक्षक अधार पाटील यांना चाकू लावत रुमालाने लोखंडी गेटला बांधून नंतर कडीकोयंडा तोडल्याचे सुरक्षारक्षकाने पोलिसांना सांगीतले आहे. घटनेची माहिती कळताच पोलिस निरीक्षक सुनील गायकवाड, उपनिरीक्षक गिरधर निकम, गजानन राठोड, महेंद्र बागुल यांच्यासह डिबी.पथकातील कर्मचार्‍यांनी घटनास्थळी घाव घेतली. पहाणी केल्यावर यावलकर यांच्या घराच्या पश्‍चिमेकडील भागाकडून चोरट्यांनी आत प्रवेश करीत कडीकोंयडा तोडून आत प्रेवश केल्याचे आढळून आले आहे.

चोरट्यांचा शोध सुरू
घटनेचे गांभीर्य पाहता स्थानिक गुन्हेशाखेचे फिंगरप्रींट पथक घटनास्थळी दाखल झाले, संशयीतांनी स्पर्श केलेल्या वस्तू आणि साहित्यांवरील बोटांचे ठसे संकलीत करण्यात आले असून श्‍वानपथकाने बसस्थनकाच्या दिशेने मार्ग दाखवला आहे. उच्चभ्रु रहिवास असलेल्या गांधीनगरात नगरसेविका वर्षा खडके यांच्या निवास्थानासमोरच यावलकर यांचे घरफोडण्यात आल्याने चोरट्यांच्या येण्या व जाण्याच्यहा दिशेने परिसरात व मुख्य रस्त्यांवरील सिसीटीव्ही कॅमरोतील चित्रीकरण संकलीत करण्यात आले असून यावलकर यांच्या निवास्थानी चोरी करण्यासाठी आलेल्या चोरट्यांच्या वाहनाचा शोध घेतला जात आहे.