जळगाव- गांधी मार्केटमध्ये बाजार करण्यासाठी आलेल्या प्रौढाचा मोबाईल शनिवारी सायंकाळी 6.50 वाजता अज्ञात चोरट्याने लांबविल्याची घटना घडली. याप्रकरणी मंगळवारी प्रौढाने दिलेल्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जुना महरूण रोडवरील रचना कॉलनी येथील रहिवासी राजेश चंदूलाल चौरसिया (वय-50) हे शनिवारी बाजार करण्यासाठी निघाले. त्यांना पोलन पेठ येथे त्यांचे मित्र निलेश हरिशचंद्र अग्रवाल व अविलेश वसंतराव वाळके हे भेटले. यानंतर तिघेही बाजार करण्यासाठी गांधीमार्केट येथे पायी निघाले. सायंकाळी 6.30 वाजता गांधी मार्केट येथे आले. राजेश यांना मित्र राजेश कासार यांचा फोन आला. बोलणे झाल्यानंतर त्यांनी मोबाईल शर्टाच्या वरच्या खिशात ठेवला. दरम्यान, 6.50 वाजेच्या सुमारास खिशात मोबाईल दिसून आला नाही. यानंतर राजेश चौरसिया व त्यांच्या मित्रांनी आजु-बाजुच्या परिसरात मोबाईलचा शोध घेतला मात्र मोबाईल मिळून आला नाही. मोबाईल चोरी झाल्याचा त्यांना खात्री झाली. याप्रकरणी मंगळवारी राजेश चौरसिया यांनी शहर पोलीस स्टेशन गाठत तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Prev Post