जळगाव-भडगाव तालुक्यातील वडगाव नालबंदी येथे मंगळवारी २ ऑक्टोंबर रोजी महात्मा गांधी यांच्या १५० वी जयंती साजरी करण्यात आली. प्रा.सुदाम राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेतील शिक्षकांनी व गावातील तरुणांनी एकत्र येत स्वच्छतेविषयी जनजागृती मोहिम राबविली. ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत,’ ‘बेटी बचाव-बेटी पढाव’ ‘एक कदम स्वच्छता की ओर’ अशा घोषणा देत गावातून रॅली काढण्यात आली.
विद्यार्थिनींनी डॉक्टर, वकील, शिक्षिकेचा पोषक परिधान करून रॅलीत सहभाग नोंदिविला. ग्रामीण रुग्णालयाचे कर्मचारी देखील यात सहभागी होते. माजी सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य मोरसिंग राठोड, पोलीस पाटील सोनी राठोड, मुख्याध्यापक, अंगणवाडी सेविका आदींनी यासाठी सहकार्य केले.