नागपूर- राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त आज देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान भाजपाने आजपासून राज्यात पदयात्रा मोहिम सुरु केली असून नागपूर येथील पदयात्रेत सकाळी भाजपा कार्यकर्त्यांसह मुख्यंमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सहभाग घेतला. भजनी मंडळींचे पारंपारिक वाद्य असलेले टाळ गळ्यात अडकवून मुख्यमंत्र्यांनी ही पदयात्रा केली. या यात्रेनिमित्त त्यांनी जनतेशी संवाद साधला. या पदयात्रेला भाजपा कार्यकर्त्यांनी मोठा प्रतिसाद दिला.
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने वातावरणनिर्मिती म्हणून प्रत्येक विधानसभा मतदारसंघात १५० किलोमीटरची पदयात्रा सुरू केली आहे. गांधी जयंतीच्या निमित्ताने आजपासून या पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. महात्मा गांधींची कर्मभूमी असलेल्या वर्धा येथून मंगळवारी या पदयात्रेला झाली.