गांधी जयंतीनिमित्त साकारला जातोय जगातला सर्वात मोठा चरखा

0

अहमदाबाद : सेवाग्राममध्ये जगातला सगळ्यात मोठा चरखा साकारण्यात येतो आहे. २ ऑक्टोबरला महात्मा गांधीजींच्या १५० व्या जयंती वर्षानिमित्त या चरख्याचे लोकार्पण करण्यात येणार आहे. सुमारे साडेपाच टन लोखंडापासून हा चरखा साकारण्यात येतो आहे. त्याच्या १६ पात्यांवर गांधीजींचे सुविचार असणार आहेत. तसेच चरखा फिरण्यासाठी दोन अश्वशक्तीची मोटार असणार आहे.

या चरख्यावर एलईडी लाईटही लावण्यात येणार आहे. हा चरखा १८.६ फूट उंच तर ३१ फूट असेल. हा चरखा मुंबईतील जे.जे. स्कूल ऑफ आर्टच्या प्राध्यापक आणि विद्यार्थी १८ जणांच्या टीमने अवघ्या २२ दिवसांत हा चरखा साकारला आहे.