गांधी जयंती प्रबोधनात्मक पद्धतीने केला साजरा

0

केंब्रिज इंटरनेशनल स्कूलचा उपक्रम
पिंपरी: केंब्रिज इंटरनेशनल स्कूल येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती व लाल बहादूर शास्त्री जयंती प्रबोधनात्मक पध्दतीने साजरी करण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष धनंजय वर्णेकर, सेक्रेटरी जानेश्‍वर काळभोर, संचालक राम रैना, प्राचार्या बबीता नायर, उप-प्राचार्या सरबजीत कौर यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतीमेचे पूजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणाच्या माध्यमातून महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जीवन व कार्य कर्तृत्त्वाची माहिती उपस्थितांना समजावून सांगितली. विद्यार्थ्यांनी महात्मा गांधींचे आवडते भजन रघूपती राघव राजाराम व साबरमती के संत या गौरवशाली भजनाचे गायन करून वातावरण भक्तीमय करून टाकले. म.गांधींचे विचार समजविण्यासाठी शालेय शिक्षक परीक्षित कुंभार लिखीत ‘माझे सत्याचे प्रयोग’ ही नाटीका सादर करण्यात आली. स्वच्छता, वाहतूक नियमांचे पालन, भ्रष्टाचार निर्मूलन व सत्यवादी विचारसरणीचे अवलंबन असे बहुमोल संदेश या प्रबोधनात्मक नाटीकेच्या माध्यमातून प्रभाविपणे देण्यात आले.

सद्वर्तन करावे
संस्थाध्यक्ष वर्णेकर म्हणाले की, दैनंदिन जीवनात अहिंसात्मक विचारसरणीद्वारे आपण स्वत: नियमांचे पालन करावे व इतरांना देखील असे वर्तन करण्यास प्रवृत्त करावे. संचालक रैना यांनी महात्मा गांधींचा जीवनपट विद्यार्यांसमोर मांडताना स्वच्छता व स्वदेशीचा मंत्र समजावला. लवकरच शाळेमध्ये प्रत्येक शनीवारी स्वच्छतेसाठी श्रमदान व पर्यावरणपूरक कागदी पिशव्या तयार करण्याचा उपक्रम सूरू करत आहेत. उपस्थीत पाहुण्यांच्या हस्ते शालेय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. महात्मा गांधीचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी काळ्भोरनगर परिसरात प्रबोधनात्मक पदयात्रा काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पथनाट्याद्वारे परीसरातील लोकांची जनजागृती करण्यात आली. शालेय परिसरात स्वच्छता आभियान राबवून या प्रबोधनात्मक कर्यक्रमाची सांगता करण्यात आली. सुत्रसंचालन प्रियांका शर्मा व वर्षा राऊळ यांनी केले.