गांधी नगरात दरोडा; रोकडसह सोन्याचे दगिन्याची लूट

0

मोलकरणीसह तिघांच्या मुसक्या आवळल्या
जळगाव – पोलिस अधीक्षक कार्यालयापासून १०० मीटर अंतरावरील प्रशस्त बंगल्यावर दरोडा पडला. घरात काम करणाऱ्या महिलेसह ७० वर्षांच्या वृद्धेला जमिनीवर अाडवे पाडून नायलानच्या दाेरीने त्यांचे हात-पाय बांधून दाेन दरोडेखोरांनी पावणेसहा लाखांचा एेवज लांबवला. ही घटना शनिवारी दुपारी १.३० वाजता घडली. दरम्यान, पाेलिसांच्या पथकाने मिळालेल्या माहितीच्या अाधावर या बंगल्यातील माेलकरणीसह तिचा भाऊ व त्याच्या दाेन साथीदारांना जामनेर तालुक्यातील पळासखेडा येथून शेतात दडवलेल्या मुद्देमालासह रात्री ११ वाजता ताब्यात घेतले.

शहरातील गांधी नगरात डॉ. नरेंद्र दोशी हे पत्नी भारती दोशी यांच्यासोबत वास्तव्यास आहे. त्यांच्या घरातील घरकाम करण्यासाठी यशोदाबाई गवळी, माधुरी पवार यांच्यासह सोनल नावाची महिला कामाला आहे. आज दुपारी १ वाजेच्या सुमारास माधूरी पवार ही डॉ. नरेंद्र दोशी यांचा जेवणाचा डबा घेवून त्यांच्या हॉस्पीटल मध्ये गेली होती. यावेळी यशोदाबाई या घरातील किचनचा ओटा साफ करीत होते तर भारती दोशी या घरातील ओट्यावर बसून पाणी पित असतांना त्यांच्या घरात दोन दरोडेखोरांनी प्रवेश केला. यावेळी भारती दोशी यांनी त्यांची विचारपुस केली असता. त्या दरोडेखोरांनी भारती दोशी यांचे तोंड दाबून यशोदाबाई यांना मारहाण करीत त्यांना नायलॉनच्या दोरीने बांधत भारती दोशी यांच्या कमरेला खोचलेल्या चाव्यांचा गुच्छा काढत पैसे ठेवलेल्या रुममध्ये गेला.

दरोडेखोर पीले दोशी यांच्या घरात पाणी
भारती दोशी यांचे हातपाय बांधून त्यांच्या कमरेला खोचलेला चाव्यांचा गुच्छा हिसकवित एक दरोडेखोर पैसे ठेवलेल्या रुममध्ये गेला. तर दुसरा दरोडेखोर हा दोशी व मोलकरीणीला बांधून ठेवलेले असल्याने त्याच ठिकाणी उभा होता. यावेळी रुममध्ये गेलेल्या दरोडेखोराने दोशी यांच्या किचनमधल्या माठातील पाणी प्यायाला आणि त्यानंतर तो दुसरा दरोडेखोर देखील त्याठिकाणाहून पसार झाला.

वीस मिनीटांनंतर झाली दोघांची सुटका
दरोडेखोरांनी घरात प्रवेश करताच त्यांनी भारती दोशी व मोलकरीण यशोदाबाई यांचे हातपाय दोरीने बांधले. दरोडेखोरांनी घरात ठेवलेला मुद्देमाल लुटून नेल्यानंतर हॉस्पीटलमध्ये जेवणाचा डब्बा घेवून गेलेली माधूरी पवार ही सुमारे २० मिनीटांनंतर घरी परतली. घरात प्रवेश केल्यानंतर त्या दोघांना दोरीने बांधून ठेवलेल्याचे दिसताच माधूरी हीने त्या दोघांनी सुटका केली.

दरोडेखोरांनी लांबविलेला मुद्देमाल
दोशी यांच्या घरातील आतील रुममधील लाकडी कपाटात ठेवलेली अडीच हजार रुपये किंमतीच्या ट्रॅव्हल्सच्या बॅगेसह दरोडेखोरांनी ३ लाख ५० हजार रुपयांची रोकड, २ लाख रुपयांच्या १० तोळ्यांच्या सोन्याच्या बांगड्या, २० हजार रुपयांची सोन्याची चैन, अडीच हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र व हजार रुपये किंमतीचा मोबाईल असा एकूण ५ लाख ७५ हजार रुपये किंमतीचा ऐवज दरोडेरोखांनी लुटून नेला.