गांधी वाचनालयात वृक्षारोपणाचा कार्यक्रम

0

नवापूर । नवापूर शहरातील महात्मा गांधी वाचनालय येथे स्वामी विवेकानंद ग्रुपतर्फे वाचनालयाचा आवारात माजी नगराध्यक्ष दामु बिराडे यांचा हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी राजेंद्र साळुंखे, दर्शन पाटील, संदिप चौधरी, निकील थेटे, कमलेश चौधरी, अतुल तांबोळी, मनिष पाटील, निकील जाधव, पंकज पाटील, निखील पवार, कुणाल लाड, संजय पाटील, सिध्दार्थ लाड, दिलीप मराठे, ग्रंथपाल सुधीर साळुंखे, मुकेश सागळे विद्यार्थी वाचक वर्ग उपस्थित होते.

प्रत्येक नागरिकांनी आपल्या घरासमोर एक झाड लावणे आवश्यक
यावेळी माजी नगराध्यक्ष दामु बिराडे म्हणाले की, वृक्षाची लागवड ही काळाची गरज झाली आहे. प्रत्येक नागरिकांनी आपल्या घरासमोर एक झाड लावले पाहीजे. वृक्ष लावणे जेवढे गरजेचे आहे तेवढेच त्यांची काळजी घेणे गरजेचे आहे. आज वृक्षाची संख्या कमी झाल्यामुळे उष्णतेचे प्रमाण वाढले आहे. तसेच पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. ’एक मुल एक वृक्ष’ अशी संकल्पना करा. झाडे लावून ती जगवणे काळाची गरज असल्याचे बिराडे यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या सफलतेसाठी स्वामी विवेकानंद ग्रुपचे कमलेश चौधरी, संदिप चौधरी सह सर्व सदस्यांनी प्रयत्न केले.